संत गाडगे बाबा समतेचे पुरस्कर्ते होते-.प्रा. जावेद शेख प्रतिनिधी दत्ता पारेकर


i

पुणे :-  संत गाडगेबाबा एक कीर्तनकार होते. सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयात गाडगेबाबांची जास्त रुची होती.
संत गाडगेबाबांनी  समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा ,भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी व प्रथा दूर करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. स्वच्छतेचे महत्व लोकांना पटवून देतं. जाती-धर्म आणि वर्ण हा भेद त्यांच्याजवळ  नव्हता. गाडगे बाबा समतेचे पुरस्कर्ते होते. अशा शब्दात संस्थेच्या राजमाता अहिल्याबाई होळकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.जावेद शेख यांनी बोलताना भावना व्यक्त केल्या.ते भिमाई आश्रमशाळेत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमावेळी इंदापूरच्या माजी नगरसेविका व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अध्यक्षा आयु. शकुंतला मखरे (काकी) यांनी संत गाडगे बाबांच्या प्रतिमेला पुष्पहार ,तथागत भगवान बुद्ध मूर्तीस व दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत अभिवादन केले.
  यावेळी मनिषा जगताप- मखरे, भिमाईचे मुख्याध्यापक साहेबराव पवार यांची भाषणं झाली. शालेय परिसरात विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेत उस्फूर्तपणे स्वच्छ्ता केली.यावेळी संस्थेचे सचिव ॲड.समीर मखरे, संतोष शेंडे, प्राचार्या अनिता साळवे, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने