मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कोंबड्याची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहन सोमवारी राज्य सीमेवर अपघात झाल्याने पलटी झाला या अपघातात वाहनातून 600 पेक्षा जास्त कोंबड्या नागरिकांनी लुटून नेल्याने वाहनांसह मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून शिरपूर कडून बडवाणी कडे जाणाऱ्या एमपी 46 जी 2105 हे कोंबड्या वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाचे राज्य सीमेवरील जामनिया शिवारात कुत्रा वाचवितांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप कठड्यावर आदळल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाला.अपघातात वाहन मालक रोहित व चालक मोहम्मद जिलानी हे किरकोळ जखमी झाले अपघात ग्रस्त वाहनात 600 पेक्षा जास्त कोंबड्या असल्याने कोंबडयाची लूटमार करण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.दरम्यान वाहनातील सर्व कोंबड्या नागरिकांनी लुटून नेल्याने वाहनाच्या नुकसानिसह मोठे आर्थिक नुकसान झाले आहे याप्रकरणी वाहनाचे चालक मोहम्मद जीलानी यांनी बिजासन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने वाहन अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
Tags
news