अवैधरित्या मद्य वाहतुक करणाऱ्या वाहनावर पिंपळनेर पोलीसांची धडक कारवाई वाहनासह देशी विदेशी कंपनीच्या मद्यासह 11 लाखांचा मुद्देमाल हस्तगत




पिंपळनेर - धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलिस स्टेशनचे एपीआय सचिन साळुंखे यांना अवैधरित्या मध्ये वाहतूक करणाऱ्या वाहनावर धडक कारवाई केली असून वाहनासह अकरा लाखांपेक्षा अधिक च्या मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.

दिनांक २०/१२/२०२१ रोजी सपोनि /सचिन साळुंखे आपल्या स्टापसह २०.३० वा. दरम्यान कुडाशी वार्सा भागात पेट्रोलिंग करीत असतांना कुडाशी ते वार्सा गावचे दरम्यान हॉटेल कार्तीकी समोर हयुन्डाई कंपनीची क्रेटा एस.एक्स मॉडेल असलेली कारचा पुढील बाजुस असलेला जी.जे.०५ आर. एच. १०६८ ची नंबर प्लेट व मागील बाजुस एम.एच.०२ ई.यु. ३३४१ नंबर प्लेट असे दोन्ही | बाजुला वेगवेगळी नंबर असलेल्या वाहनावर संशय आल्याने त्यास चेक करण्यासाठी गेले असता वाहनावरील चालक यांस पोलीस आल्याची चाहुल लागताच तो त्यांचे ताब्यातील वाहन जागीच सोडुन पळुन गेला. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात खालील  देशी विदेशी कंपनीचा अवैध मद्य साठा मिळुन आला आहे. या कारवाईत १,३६,८७५/- रुइम्पलेरियल ब्ल्यु, ब्लेन्डर स्प्राईड, रॉयल चॅलेंज विदेशी दारुच्या, रॉयल स्पेशल

१०,००,००० /-रु

व्हिस्की बॉटल्स व कासबर्ग, किंगफिशर बिअर डब्बे एक पांढऱ्या रंगाची हयुन्डाई कंपनीची क्रेटा एस. एक्स मॉडेल असलेली कार व दोन नंबर प्लेट  मिळुन आल्या असा एकूण 11,36,875 ( 11 लाख 36 हजार 875 रुपये) त्या मुद्देमाल मिळून आला आहे.
सदर वाहनाचे चालक व मालक यांनी आपसात संगणमत करुन शासनाचे फसवणुक करण्याचे उद्देशाने वाहनाचे पुढील बाजुस व मागील बाजुस दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट | बसवुन बनावटी करण करुन वरील वर्णनाचा अवैध मद्य साठा वाहतुक करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगुन पोलीसांची चाहुल लागताच पळून गेला आहे. सदर बाबत चालक व मालक यांचे विरुध्द पोशि विजय पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार  पिंपळनेर पोलीस स्टेशनला  गुरनं ३०९/२०२१ दाखल करण्यात आला असुन | पुढील तपास सपोनि / सचिन साळुंखे करीत आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रविणकुमार पाटील मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत बच्छाव, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदिप मैराळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो. निरीक्षक सचिन साळुंखे, पोना/विशाल मोहने, पोशि/ मकरंद पाटील, पोशि/विजय पाटील, पोशि/भुषण वाघ, पोशि/रविंद्र सुर्यवंशी, पोशि/पंकज वाघ इत्यादी च्या पथकाने केले आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने