युवराज माळी यांना राज्यस्तरीय युवानेता पुरस्कार जाहीर




शिरपुर प्रतिनिधी:-ओबीसी चळवळ पुरस्कृत ओबीसी फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल युवा नेता पुरस्कार व नारीशक्ती पुरस्कार देवुन गौरविण्यातआले.समाजाचे व्रत हाती घेतलेल्या पुरोगामी महाराष्ट्रातील सर्व जाती- धर्मातील निवडक युवा कार्यकर्त्यांची निवड जाहीर करण्यात आली होती.यात धुळे जिल्ह्यातुन शिरपुर-वरवाडे येथील क्रांतीजोति सावित्रीबाई फुले सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,बापुजी युवा फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष,साप्ताहिक युवा मैदानचे संपादक युवराज पंडित माळी यांना युवानेता पुरस्काराने  महात्मा फुले पुणेरी पगडी,प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून संस्थेचे अध्यक्ष संजयजी कोकरे यांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले. 



व्यासपीठावर महाराष्ट्र महिला अध्यक्षा  डॉ.माधुरी पारपल्लीवार,कार्याध्यक्ष मोहम्मद ईकबाल,संघटक पुंडलिक निखाडे, पश्चिम संघटक कालीदास सोनवणे,युवानेते विहार संजय कोकरे,डॉ.सौ.समिना मुकादम,गजानन शिरसाठ इ.मान्यवरांच्या  उपस्थित मराठी पत्रकार भवनात दिनांक १८ डिसेंबर २०२१ रोजी करण्यात आला.



याप्रसंगी
संजय कोकरे म्हणाले की,महाराष्ट्राची भुमी ही संतांची तर आहेच,तशी समाजसेवकांचीही आहे.समाजसेवकाचे कार्य करीत असतांना,विविध संकटांना सामोरे जा
णारे, कुणाच्याही दबावाला बळी न पडणारे, प्रतेकाशी सामना करणारे,कोणत्याच संस्थेच्या नजरेत न आलेल्या,एस.सी,एन.टी,व ओबीसींचे कार्य करणाऱ्या, राजकारणाशी संबंध‌ नसलेल्या,सर्वसामाण्य घराण्यातील,सर्व जातीपातीच्या नागरीकांसाठी झटणाऱ्या निस्वार्थी युवा कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करणे हे ओबीसी फाऊंडेशनचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे प्रखड मत कोकरे यांनी मांडले.या‌ पुरस्कार वितरण सोहळ्यात महिला कार्यकर्त्यांचाही नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले.सद्या ओबीसींना विविध समस्यांनी ग्रासले आहे. ओबीसींच्या सर्व संघटनांनी एकत्र येवून लढा दिल्यास महाराष्ट्रात आपली ओबीसी सत्ता आल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी सांगितले.युवराज माळी यांना धुळे जिल्ह्यातुन ऐकमेव युवा पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने