शिरपूर तालुका वीज ग्राहक संघाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा, गोपाल के. मारवाडी तालुकाध्यक्ष व मोहन पाटील यांची तालुका कार्याध्यक्षपदी सर्वसंमतीने नियुक्ती !





  शिरपुर(प्रतिनिधी):-वीज ग्राहकांच्या समस्या संदर्भात नुकतीच बैठक संपन्न झाली. त्यात गोपालभाई के.मारवाडी (पत्रकार दैनिक भास्कर) यांची तालुकाध्यक्ष  पदासाठी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.तालुका कार्याध्यक्ष पदासाठी मोहन साहेबराव पाटील, तालुका  उपाध्यक्ष एडवोकेट  गोपालसिंह राजपूत,तालुका सरचिटणीस पदासाठी कल्पेशसिंह जमादार व शिरपूर शहराध्यक्ष पदासाठी हेमंत गुलाबराव पाटील,तर शहर कार्याध्यक्ष पदी हेमराज राजपूत यांची निवड करण्यात आली. तालुका संघटक प्रमुख मिलिंदभाऊ पाटील(हिंगोणी) आणि शहर संघटक प्रमुख ओंकार आबा जाधव 
शहर कार्यकारिणीत शहर उपाध्यक्ष संजय रघुनाथ आसापुरे, शहर सरचिटणीस पत्रकार महेंद्रसिंग राजपूत(निर्भिड विचार)यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली.महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती आणि वितरण महामंडळाच्या बेजबाबदार आणि अन्यायकारक कार्यांविरुद्ध ग्राहकांच्या बाजूने आवाज उठवणे हा आमच्या संस्थेचा उद्देश आहे आणि आपल्या सर्व सामान्य, व्यावसायिक  आणि घरगुती वीज ग्राहकांना तसेच शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करावा लागेल आणि आम्ही महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी  या आधी सुध्दा कार्य केले आहे आणि भविष्यात सुध्दा प्रयत्नशील राहणार आहोत.






सर्वत्र एमएसईबीच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांना न्याय्य हक्क मिळावेत, यासाठी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रतापराव होगाडे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या विषयांवर जनजागृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या वीज बिलात माफीची योजनेचे खरे स्वरूप समजून घेऊन त्याचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांना कसा मिळेल याकरिता लवकरच महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष प्रा.शाम पाटील सर यांच्या पुढाकाराने धुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या वीज बिलात माफी योजनेशी संबंधित असलेल्या सर्व शंका दूर करून त्यांना वीज बिल माफीचा अधिकाधिक लाभ मिळवून देणे हा या बैठकीचा उद्देश राहील.  खऱ्या अर्थाने लागू असलेले वीज बिल भरण्यासंबंधी मार्गदर्शना करिता बैठकीची तारीख निश्चित करून लवकरच  धुळे जिल्हा, शिरपुर तालुका व शहरातील सर्व शेतकरी वीज ग्राहक बंधू- भगिनींना कळविण्यात येईल. उल्लेखनीय आहे कि महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना ही नोंदणीकृत संघटना असून राज्य वीज नियामक आयोगापुढे सर्व प्रकार च्या वीज ग्राहकांचे प्रश्न मांडून ग्राहकहितासाठी कटिबद्ध अशी संघटना आहे. वीज ग्राहक संघटनेच्या नवनियुक्त कार्यकारिणीचे शिरपूर तालुका व शहरात ठिकठिकाणी अभिनंदन होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने