शिरपुर - शहर पोलीस स्टेशन हद्दीत दि.०४ रोजी पोलीस निरीक्षक श्री रविंद्र देशमुख यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली होती की मुंबई आग्रा महामार्ग क्र ३ वर टोलनाका शिरपर कडे येणारी टाटा कंपनीची मालट्रक क्र पी बी ४६ एम ३६७७ हिच्यात कत्तली च्या उद्देशाने अवैधरित्या १३ गायी व १ बैल असे भरुन वाहतुक होत आहे,
त्यावरुन पोलीस निरीक्षक श्री रविंद्र एन देशमुख यांच्या आदेशावरुन असई आर. एन. मोरे, हेकॉ. अशोक धनगर, पोना. हेमंत सुभाष पाटील, पोना. हेमराज व्ही जाधव, पोकॉ. भुषण सुरेश कोळी अंशानी शिरपुर टोलनाका येथे जावून पंचासह सापळा लावला असता दि.०४ रोजी १६.३० वाजता इंदौर कडुन धुळे कडे येणारी टाटा कंपनीची मालट्रक क्र पी बी ४६ एम ३६७७ हिच्यात चालक चान पवितरसिंग काश्मीरसिंग जाटवासी वय ५४ रा. रायपुर खुर्द ता अजनाला जि अमृतसर (पंजाब) असे सांगुन त्याचे सोबत साथीदार कप्तानसिंग पालसिंग वय-२४ धंदा-क्लिनर रा. झंढी, टाला रोड ता जि अमृतसर (पंजाब) याचे ताब्यातील टाटा कंपनीची मालट्रक क्र पी बी ४६ एम ३६७७ या वाहनामध्ये १३ गायी व १ बैल यांना आखुड दोरीने बांधुन व वाहनात कोंबुन त्यांची निर्दयीपणे वाहतुक करुन कत्तलीसाठी घेवून जातांना सदरचे वाहन व त्यामधील १३ गायी व एक बैल (गोवंश जनावरे) सह मिळून आल्याने त्यांचे वाहनासह खालील प्रमाणे
८,००,०००/- रुकिची टाटा कंपनीची मालट्रक क्र पी बी ४६ एम ३६७७ ची सफेद रंगाचे वाहन
९४,०००/- चे गुरे असा एकूण, ८,९४,०००/ रुकि.ची १३ गावी व १ बैल जप्त केला आहे.
यात एकुण १३ गायी व १ बैल ( गौवंश जनावरे) यांच्या देखभाल व संगोपन करण्यासाठी त्यांना मा. व्यवस्थापक चेतक गो-शाळा गोदी, ता शिरपुर जि धुळे या गो- शाळेत दाखल केले असुन वरील इसमाविरुध्द प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा कलम १९६० चे ११ (१) (ड) (घ) (च) सह महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम सन १९९५ चे कलम ५ (अ) चे उल्लघन ९ प्रमाणे तसेच प्राणी वाहतुक नियम १९७८ प्रकरण ४ थे मधील नियम ४७ (अ),५०, ५२, ५४,५६, चे उल्लघंन म्हणून प्राणी क्लेश प्रतिबंध १९६० चे कलम ३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा पोलीस अधिक्षक श्री प्रविणकुमार पाटील सो, मा अपर पोलीस अधिक्षक श्री प्रंशात बच्छाव सो ,मा उपविभागीय पोलीस अधिकारी सो शिरपुर भाग शिरपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री रविंद्र देशमुख, असई आर. एन. मोरे, हेकों. अशोक धनगर, पोना. हेमंत सुभाष पाटील, पोना. सुरेश कोळी,हेमराज जाधव, पोको भुषण यांनी केली आहे.
Tags
news


