शिरपूर तालुक्यात विकासाची लाट राज्यकर्त्यांनी सर्वच सहकारी प्रकल्पाने कडे फिरवली पाठ



महेंद्रसिंह राजपूत

शिरपूर तालुक्यात विकासाची लाट
 राज्यकर्त्यांनी सर्वच सहकारी प्रकल्पाने कडे फिरवली पाठ  अशी आजची सत्य परिस्थिती असून तालुक्यातील सहकारात असहिष्णुतेचा व राजकीय अहंकाराच्या नवा अध्याय तालुक्यातील जनता गेला गेल्या एक दशकापासून पाहत आहे. तालुक्यातील शीर्ष नेतृत्वाने सहकार चळवळीला  पाठबळ न दिल्याने व स्वतःच्याच खाजगी उद्योगांवर भर दिल्याने तालुक्यातील सहकारी प्रकल्प मरणासन्न अवस्थेत आहेत .


तालुक्यात जननायक ,जलनायक ,विकास रत्न अशा विविध उपाधिनी सन्मानित नेततृत्व पाय लावेंन तेथे पाणी आणि हात लावेंन तेथे सोने निर्माण करण्याची क्षमता असलेल्या नेत्यांनी सहकार चळवळीकडे पाठ फिरवल्याने साखर कारखाना व इतर सहकारी प्रकल्पांची वाताहत व अवहेलना झाली आहे.


मागील एक दशकात तालुक्यातील राजकारण शिरपूर साखर कारखाना च्या मूदयवर फिरत होते .तालुक्यातील विधान सभा व लोकसभा देखील या मुद्यावर लढल्या गेल्या मात्र राजकारणाची संधी साधून सर्वांनीच याकडे पाठ फिरवली व जनतेला दिलेले आश्वासन कोणीही पाडले नाही .आणि त्याची प्रचिती आज अशी आहे मागील दहा वर्षांपासून शिरपूर सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत असून राजकीय व न्याय प्रक्रियेत अडकून पडला असून राजकीय अनास्थेचा बळी ठरला आहे 
आता पुन्हा शिरपूर सहकारी साखर कारखाना किमान भाडे तत्त्वावर देऊन पुनर्जीवित करण्यासाठी काही सामाजिक संघटना पुढे येत आहेत व आंदोलना ची जनजागृतीची मशाल पेटवत आहेत.                    



शिरपूर सहकारी साखर कारखाना सुरू करण्याबाबत एक बैठक संपन्न झाली असून सर्वतोपरी शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा जीवनदायी प्रकल्प सुरू करण्यासाठी जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.                    

 हा सहकारी साखर कारखाना 2011 पासून म्हणजे 10 वर्षांहून अधिक काळ बंद आहे.यामुळे शिरपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला ब्रेक लागला असून तालुक्यातील शेतकरी बंधू भगिनींसह सर्वच घटकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. शिसाका बंद मुळे कामगार, शेतकरी, व्यापारी वर्ग प्रचंड नुकसान झाल्याने तो नाराज झाला आहे. सदर साखर कारखाना म्हणजे महत्त्वपूर्ण सहकारी प्रकल्प बंद पडणे हे त्याद एक प्रमुख कारण आहे.कारण हा सहकारी साखर कारखाना सुरू राहिला असता तर, दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल शिरपूर तालुक्यात झाली असती. त्यामुळे येथील आर्थिक विकास होण्यास मदत होणार होती. परिसरातील शेतकरी, मजुरांसह कामगार व  सामान्य माणसाचा देखील आर्थिक विकास या मुळे मंदावला आहे. 

शेजारील शहादा, चोपडा, नंदुरबार, नवापूर येथील सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर देऊन सुरळीत चालवले जात आहेत.त्या चारही कारखान्यांचे बॉयलर पेटले असून,आपल्याकडे शिसाकाच्या विद्यमान निवडून आलेल्या संचालक मंडळाने गेली पाच वर्षे वाया घालवली आहेत. याला त्यांची अनिर्णयतेची स्थिती व सुळाचे राजकारण त्यास कारणीभूत आहे. आता सर्वसामान्य जनतेने एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या जीवनदायी प्रकल्पाला संजीवनी देण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा.कारण सध्याच्या संचालक मंडळाची मुदत संपूनही त्यांना कोणतीही मुदतवाढ मिळालेली नसताना, अद्यापही पदावरुन पायउतार झाले नाहीत. त्यामुळे सदर साखर कारखाना भाडेतत्वावर चालविला जाण्याचा  मार्गही बंद होत आहे.यावरून हे स्पष्ट होते की, शिरपूर सहकारी साखर कारखाना सुरू करून तो सुरळीत चालवण्यात सध्याच्या संचालक मंडळाला स्वारस्य नाही.येत्या काळात या विषयावर लवकरच जनजागृती करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहे. लवकरच शिसाका बचाव समिती तर्फे उपोषणास बसण्याचा निर्णयही या सभेत उपस्थित सर्वांनी एकमताने मंजूर केला. सोबत इतर सहकार्य प्रकल्पांना बाबत देखील या बैठकीत चर्चा संपन्न झाले आणि पुन्हा एकदा शिरपूर सहकारी साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरु करण्याबाबत शेतकरी संघटना व विविध सामाजिक संघटना मध्ये चर्चा होऊन पुढील रणनीती तयार केली जात असून येत्या काळात जनता या प्रश्नाला कितपत महत्त्व देते व ज्या राजकीय अनास्थेमुळे साखर कारखान्याची वाताहत झाली त्यांना आगामी काळात सीशाखा बाबत जाब विचारून त्यांची राजकीय कोंडी करून त्यांनी केलेल्या कृत्याच्या भांडाफोड करण्याचे काम आता खुद्द शेतकरी संघटनांनी आपल्या हाती घेतला आहे त्यामुळे आगामी काळात शिरपूर सहकारी साखर कारखाना हाच गुन्हा कळीचा मुद्दा असेल असे संकेत तालुक्यात मिळत असून सिसका सुरू करण्याबाबत सर्वच पर्यायांवर विचार होऊन लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे

 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने