धुळे प्रतिनिधी- धुळे जिल्ह्यात येत्या 24 तासात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात असून जिल्ह्यातील सर्वच शासकीय व पोलीस यंत्रणेला सतर्कतेचा इशारा जिल्हाधिकारी जलक शर्मा धुळे यांनी दिला असून जनतेला देखील सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांच्याकडून दिलेल्या संदेशात असे नमूद केले आहे की अरबी समुद्रात येत्या 24 तासात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता हाजापुर क्षेत्रातील भारतीय हवामान विभागाने वर्तवली असून त्यामुळे दिनांक 2 डिसेंबर रोजी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांना सतर्क करून सुरक्षित स्थळी थांबवावे असे आवाहन जिल्हाधिकारी धुळे यांनी केले आहे .
सदरच्या अवकाळी पाऊस झाल्यास तापी नदीची पाण्याची पातळी वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे नदी काठावरील गावांना देखील सतर्कतेचा इशारा देऊन कोणीही नागरिक अथवा पाळीव प्राणी नदीकाठी जाणार नाहीत या बाबत जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय आवश्यकतेनुसार नदीकाठावरील धोक्याच्या ठिकाणी वास्तव्य असलेले लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगावे व आपल्या हद्दीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश विविध सरकारी यंत्रणा व पोलिस विभागांना देण्यात आले आहेत.
Tags
news



