आज दि. शहरातील भिमनगर, रमाई नगर येथे ७२ व्या संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भिमनगर येथील कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश भिडे, तसेच रमाई नगर येथील कार्यक्रमाचे अध्यक्ष फकिरा थोरात होते. कार्यक्रमाची सुरुवात बुध्दवंदनाने झाली. त्यानंतर संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती रामभाऊ माणिक, जितु गिरासे, वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष फकिरा थोरात,
मुकुंद माणिक, बी.डी.साळवे, विजयकुमार पेंढारकर, डी.एम.पानपाटील, संजय बैसाणे, राम वाघमारे, दिपक सोनवणे, संतोष रामराजे, धनराज खैरनार,महेंद्र शिरसाठ, भूपेंद्र मोहिते, राकेश ईशी, कुणाल मोहिते तसेच वंचित बहुजन आघाडी,भारतीय बौध्द महासभा शिंदखेडा,दि बुद्धिस्ट सोशल ग्रुप दोंडाईचा, येथील पदाधिकारी, आंबेडकरी अनुयायी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला भाऊसाहेब भामरे यांनी संविधान सविस्तर मार्गदर्शन केले.
Tags
news
