दिनांक. 26 डिसेंबर 2021 रोजी जिरायीतपाडा - मेलाणे ता. चोपडा जि. जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या समाज प्रबोधन मेळावा आणि शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम मा. दौलत पारशा पावरा. मुख्याध्यापक यांचे अध्यततेखाली आणि मा. रामचंद्र वरजू भादले. नरेंद्र रायसिंग भादले. बिलरसिंग वांग-या बारेला. बाबुराव तेजमल पावरा. चंदरसिंग पावरा. राजाराम फत्तू पावरा यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री चंपालाल बारेला - अध्यक्ष. रमेश भादले - कोषाध्यक्ष. कुवरसिंग बारेला - चिटणीस. दिलीप बारेला - उपाध्यक्ष. आणि बिलदार पावरा. मिलदार भिलाला. प्रताप बारेला. सत्तरसिंग बारेला. मगन बारेला व समस्त गावकरी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात विविध विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय संस्थापक - अध्यक्ष मा. इंजि. रविंद्र आर्य मुंबई यांचे विशेष मार्गदर्शन लाभले....
Tags
news
