*शिंदखेडा (प्रतिनिधी)* : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील नगर पंचायत हद्दीत प्रभाग क्र. 16 मध्ये जनतानगर व माळीवाडा परिसरातील नागरिकांनी सभागृह व रस्ता व्हावा यासाठी सातत्याने शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके यांचेकडे पाठपुरावा चालु ठेवला होता.
शिंदखेडा नगर पंचायत हद्दीत सभागृह व ट्रिमीक्स रस्ता होणेसाठी नगरविकास मंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेऊन पत्रव्यवहार केला होता. शिंदखेडा शहरातील पाच कोटी रुपयांची कामे सुचविली होती. त्यातील पहिल्या टप्प्यात प्रभाग क्र. 16 मध्ये पंचवीस लक्ष किंमतीचे सभागृह व पंच्याहत्तर लक्ष किंमतीचा जनता नगर व्यायामशाळा ते एस.एस.व्ही.पी.एस कॉलेज पर्यंतचा रस्ता ट्रिमीक्स पध्दतीने होणार आहे. सदर काम मंजुरीचा आदेश नुकताच प्राप्त झाला असून लवकरच कामाचे अंदाजपत्रक व प्रशासकीय मान्यता होवुन कामाची सुरुवात होणार आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. हेमंत साळुंके यांनी पत्रकान्वये दिली आहे.
सदर काम मंजुरी नंतर शिंदखेडा विधानसभा संघटक श्री.गणेश परदेशी, तालुका समन्वयक श्री.विनायक पवार, शिंदखेडा शहरप्रमुख श्री.संतोष देसले यांनी समाधान व्यक्त केले. सदर काम मंजुरीसाठी शिवसेना संपर्कप्रमुख श्री.बबनराव थोरात व पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांचे आभार शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके यांनी मानले आहेत.
Tags
news
