शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील रस्ता लूट प्रकरणात वाहनाला अडवून रोख रक्कम लुटून नेणाऱ्या सर्व आरोपींना अवघ्या चार तासांच्या आत शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
तालुका पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कता व वेगवान तपास याची सर्व स्तरावरून कौतुक होत आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 14 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास प्रदीप नाभीराज चौघूले राहणार रूकडी ता. हातकंणगले जिल्हा कोल्हापूर ड्रायव्हर व इतर दोन व्यक्तींच्या सोबत इंडिगो गाडी क्रमांक जि .जे 5 89 88 या गाडीने खंबाळा मार्गे जामन्या पाडा येथे ऊस तोड मजूर घेण्यासाठी जात असताना त्यांच्या गाडीला खंबाळे गावाच्या स्मशानभूमीजवळ दोन मोटर सायकल वरील पाच जण डोक्यात कानटोप्या व तोंड बांधलेले 25 ते 30 वयोगटातील इसमांनी त्यांच्या इंडिगो गाडी ला मोटरसायकल आडवी लावून गाडीची चावी काढून व इतर यांनी ब्लड लावून त्यांना दुखापत करण्याची धमकी देऊन प्रदीप चौगुले यांच्या जवडील 72 हजार रुपये रक्कम रोख घेऊन पळून गेले. त्यावरून शिरपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 102 / 2021 दाखल करण्यात आला होता .
सदर घटना कळाल्यानंतर तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ तपासाची चक्रे फिरवली व गोपनीय बातमीदार यांच्या आधारे व फिर्यादी यांच्या वर्णनावरून अवघ्या चार तासांच्या आत आरोपींना जेरबंद केले यात विनोद गंगाराम भिल, रवींद्र देविदास भिल, भोजू राजेंद्र भिल ,सागर गजमल भिल, अजय भाऊसाहेब कोळी राहणार सर्व नवे लोंढरे तालुका शिरपूर व पांडुरंग भगवान भ रा.नवे भमपुर तालुका शिरपूर या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरून नेलेली रक्कम 72 हजार रुपये हस्तगत करण्यात आली व या गुन्ह्यात वापरलेल्या मोटर सायकल देखील जप्त करण्यात आल्या आहेत.
सदर गुन्ह्याच्या तपास मा पोलीस अधीक्षक श्री प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, मा उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, भिकाजी पाटील पोलीस कॉन्स्टेबल सुनील मोरे ,चतुरसिंग खसावत, योगेश मोरे ,सईद शेख संजय माळी संजय भोई इत्यादींच्या पथकाने केली आहे.
Tags
news



