शिरपूर वरवाडे नगरपरिषदे मार्फत माझी वसुंधरा अभियान २.० ची अंमलबजावणी व विविध उपक्रम




शिरपूर : शिरपूर वरवाडे नगरपरिषदे मार्फत माझी वसुंधरा अभियान २.० ची अंमलबजावणी व विविध उपक्रम सुरु करण्यात आले आहेत.

पर्यावरण व हवामान बदल विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत संपूर्ण राज्यभरात माझी वसुंधरा अभियान २.० ची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून शिरपूर वरवाडे नगरपरिषदे मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. 

शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचा एक भाग म्हणून दि. १५ नोव्हेंबर २०२१ रोजी माझी वसुंधरा अभियानांतर्गत सुभाष कॉलनी परिसरातील नागरिकांना पर्यावरण सुधारणा व संरक्षणा बाबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून ई-प्लेज (ई-प्रार्थना) आणि माझी वसुंधरा अंतर्गत जागरुकता निर्माण होणे कामी आरोग्य सहाय्यक दिपाली साळुंके यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित नागरिकांना वाहनमुक्त दिवसाचे आयोजन करणे, नैसर्गिक ऊर्जेचा स्त्रोत म्हणून सोलर पॅनल चा वापर करणे, घराच्या आसपास रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, वृक्ष लावणे, त्याचे संवर्धन व संगोपन करणे, कचरा विलगीकरण, प्लास्टिक बंदी, कंपोस्ट खत तयार करणे, कापडी पिशवीचा वापर करणे,  इ. बाबत माहिती देण्यात आली असून नागरिकांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला. 

कार्यक्रम दरम्यान नागरिकांकडून सौ.ज्योती चौधरी व सर्वांनी यांनी हरित शपथ घेतली. माझी वसुंधरा अभियानांतर्गत महिलांनी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन करावे असे जाहीर आवाहन नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांनी केले. त्याच प्रमाणे सौर ऊर्जेचा वापर शहरात वाढविण्यात यावा याबाबत उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी कार्यक्रम प्रसंगी केले. 

यावेळी सुभाष कॉलनी येथील महिला रहिवासी सौ. शकुंतला फिरके, सौ. इंदिरा रामदास बावस्कर, सौ. हरीबेन पटेल, सौ. प्रविणा राजपूत, सौ. मंदाकिनी पाटील, सौ. रोझी देशमुख, सौ. वंदना पटेल, सौ. रेखा शिंपी, सौ. रोहिणी पवार, सौ. उज्वला पाटील, सौ. माधुरी जाधव, सौ. सुवर्णा पाटील, सौ. वर्षा जाधव, जानव्ही पवार तसेच सुभाष कोलनी युथ फोरमचे ललित फिरके, अरुण पटेल, संजय भास्करराव पाटील, योगेश राजपूत, सचिन सिसोदिया, अशोक बाफणा, मनोज पटेल, संदीप पाटील, प्रशांत जाधव, मनोज पाटील, अनुप बावस्कर, वासुदेव चौधरी, बापू महाजन, धीरज देशमुख यांनी हरित शपथ (e -pledge) घेतली. तसेच भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालय मार्फत शिरपूर वरवाडे नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत 3 स्टार नामांकन प्राप्त झाल्याबद्दल सुभाष कॉलनीतील महिला व सभासदांनी नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांचे अभिनंदन केले.

सदर कार्यक्रमात शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे नोडल ऑफिसर सागर कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक जितेंद्र अहिरे, आरोग्य सहाय्यक दिपाली साळुंके, श्रीजी इव्हेंट मॅनॅजमेण्ट गृपच्या प्रकल्प समन्वयक सुषमा पवार, ज्योती चौधरी, ज्योती पाटील उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने