सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा यांच्याद्वारे सातपुड्याच्या दुर्गम भागात टाकळी गावात चिमुकल्यांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी चिमुकल्यांना दिवाळीचा फराळ व मिठाई देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून एलआयसी अधिकारी राहुल भारत सोनवणे हे होते .कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश भैय्या सोनवणे अध्यक्ष सेवाभावे प्रतिष्ठान,तळोदा हे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवाभावे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री संतोष जगत चौधरी यांनी केले. संचालक श्री.नकुल दिल्या ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळेस सेवाभावे प्रतिष्ठानचे संचालक श्री नकुल ठाकरे म्हणाले की सेवाभावे प्रतिष्ठान ही आमची ग्रामीण/दुर्गम भागात सतत सेवा कार्य करत असते व त्यातील एक भाग म्हणजे आज दुर्गम भागात साजरी केलेली दिवाळी व असे कार्य सातत्याने आमच्या द्वारे होईलच अशी त्यांनी आशा व्यक्त केली.
या कार्यक्रमाला सेवाभावे प्रतिष्ठानाची ग्राम समिती टाकळी अध्यक्ष श्री.सुरपसिंग काला ठाकरे उपाध्यक्ष श्री.धरमसिंग ठाकरे सचिव श्री चंबुलाला ठाकरे ग्राम सदस्य श्री. गोरख ठाकरे,श्री. रोहित वसावे.
या कार्यक्रमाचे नियोजन चि.कल्पेश सोनवणे,चि मयूर कलाल,श्री.सुनील मोरे, यांनी केले.
Tags
news
