कु. हर्षदा सुनिल देसले या विद्यार्थीनीने बी.एस.सी. (कृषी) पदविकेमधे सुवर्ण पदक दोडाईचा (अख्तर। शाह)





शिदखेडा--  कृषी पदवीमध्ये स्वर्ण पदक प्राप्त  केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शिंदखेडा तालुकातर्फे संदीप दादा बेडसे यांच्या हस्ते सत्कार.करण्यात आले
कु. हर्षदाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना तिच्या पुढील   यु.पी.एस.सी. क्लासेसचा सर्व खर्च मा. संदीप दादा बेडसे करणार असल्याबाबत हर्षदाच्या पालकांना आश्वासित केले.
शिंदखेडा येथील श्री. सुनिल देसले यांच्या कन्या कु. हर्षदा सुनिल देसले या विद्यार्थीनीने बी.एस.सी. (कृषी) पदविकेत प्रथम क्रमांकानी उत्तीर्ण होऊन विशेष प्रावीण्य मिळवले. नुकत्याच झालेल्या राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३५ वा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. या समारंभात कु. हर्षदा हिचा देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरद्चंद्रजी पवार साहेब, राज्याचे राज्यपाल मा. भगसिंगजी कोश्यारी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री मा. नितीनजी गडकरी साहेब व विद्यापीठाचे कुलपती यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कु. हर्षदा देसले या विद्यार्थीनीचे वैशिष्ठ्य असे की पदवीचे शिक्षण घेत असतांना दरवर्षी विशेष प्राविण्याने उत्तीर्ण होऊन प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक प्राप्त करून सलग ४ वर्षे सुवर्णपदक मिळवणारी एकमेव विद्यार्थीनी ठरली. कु. हर्षदाचे वडील श्री. सुनिल देसले यांनीदेखील सायकल दुरुस्तीचे दुकान चालवित अतिशय प्रतिकूल परिस्थितीही आपल्या कन्येच्या शिक्षणासाठी अपार कष्ट घेतलेत त्याबद्दल त्यांचे आणि कु. हर्षदाला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या सर्व प्राध्यापकांचे देखील मनापासून अभिनंदन. कु. हर्षदाच्या या यशाने तिच्यावर संपूर्ण जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. 
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष मा. संदीप दादा बेडसे यांच्यासोबत कु. हर्षदाचे पालक, शिंदखेडा शहराध्यक्ष प्रविण पाटील, मांडळ येथील वकील पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मयुर बोरसे, तालुका उपाध्यक्ष दिपक जगताप, युवक तालुकाध्यक्ष चिराग माळी, विधानसभा क्षेत्रप्रमुख दिपक गिरासे, युवकचे विधानसभा क्षेत्रप्रमुख दुर्गेश पाटील, शिंदखेडा शहर उपाध्यक्ष मिलिंद देसले, ओ.बी.सी. सेलचे जिल्हा संघटक ईश्वर माळी, दोंडाईचा शहर कार्याध्यक्ष दयाराम कुंवर, युवक जिल्हा संघटक दर्पन पवार, युवकचे शिंदखेडा शहर उपाध्यक्ष चेतन देसले, किसान सेलचे गुलाबराव पाटील, रवी बापु देवरे, छत्रपाल पारधी, हेमंत पाटील, परेश पाटील आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने