डाबली येथे जलशुध्दीकरण सयंत्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते उदघाटन
शिंदखेडा (प्रतिनिधी) : आपले गांव आरोग्याच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी शुध्द पाणी मिळणे महत्वाचे आहे. जलशुध्दीकरण सयंत्राच्या माध्यमातून डाबली गावाचा शुध्द पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. आता गावातील ग्रामपंचायत कार्यालय, गटारी, ओपन जीम तसेच पिण्याचा पाण्याची समस्यासह टप्प्या टप्प्याने विकासाचे प्रश्न कायमचे मार्गी लावू, असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी येथे व्यक्त केला.
जिल्हा वार्षिक योजना नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत डाबली येथे जलशुद्धीकरण सयंत्र (RO फिल्टर) लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या आर.ओ. फिल्टरचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी फित कापून केले. याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, डाबली गावात अनेक विकासकामे रखडलेली होती.
त्यातील महत्वाचा प्रश्न शुध्द पिण्याचा पाण्याचा होता. जलशुध्दीकरण सयंत्र बसविल्याने तो आता सुटला असून गावातील ग्रामस्थांचे श्रध्दास्थान गोरक्षनाथ महाराज मंदीराचे काम सुरु होणार आहे. गावाला स्वत:चे ग्रामपंचायत नाही. यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत शिंदखेडा तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीला हक्काचे ग्रामपंचायत बांधण्यासाठी लवकरच मान्यता मिळणार आहे. यासह गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न, गावातील गटारीचा प्रश्न टप्प्या टप्प्याने विकासाचे प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लावण्यात येईल, असेही ते म्हणाले
.
दरम्यान शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटीलम्हणाले की, मतदार संघात अनेक पुढारी आहेत. मात्र रावसाहेबांच्या कामाची बरोबरी कोणीही करु शकत नाही. निस्वाथपणे काम करणे हेच साहेबांना माहिती असून जनतेच्या संपर्कात राहणारा माणुस आहे. शिंदखेडा मतदार संघात लवकरच परिवर्तन होणार फक्त हेमंत साळुंके हेच निवडुन येऊ शकणार, असल्याचे त्यांनी सांगितले.




