शिरपूर च्या दाउदी बोहरा समाजातर्फे महिलांसाठी कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन




शिरपूर (प्रतिनिधी)

 शिरपूरच्या दाऊदी बोहरा समाजाने  कोरोना प्रतिबंधक 100% लसीकरण चे उद्दिष्ट साध्य करून इतर समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे तसेच  आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या प्रत्येक वार्डात लसीकरण कॅम्प आयोजित करून मिशन कवच-कुंडल अभियान यशस्वीपणे राबविला जात आहे.


 दाऊदी बोहरा समाजाने आपल्या समाजातील महिलांसाठी कॅन्सर निदान व क्लिनिकल शिबिराचे  आयोजन करून महिलांमध्ये उद्भवणार्‍या विविध प्रकारच्या कॅन्सर विषयी जागृकता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे शिबिराचे आयोजन स्तुत्य आहे असे गौरवोद्गार आमदार काशीराम दादा पावरा यांनी काढले. आमदार अमरीश भाई पटेल, नगराध्यक्ष सौ जयश्री बेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या सहकार्याने शिरपूर  दाऊदी बोहरा  समाजा च्या हेल्थ अफेयर्स कमिटीतर्फे बोहरा समाजाच्या मस्जिद  हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात ते बोलत होते .


   याप्रसंगी धुळ्या चे कॅन्सर तज्ञ डॉक्टर तुषार पाटील यांनी  मार्गदर्शन करताना सांगितले की आजच्या धावपळीच्या व स्पर्धात्मक युगात पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरण यामुळे आपल्या शरीराच्या आरोग्यावर विपरीत  परिणाम होत असून विविध प्रकारांची आजार सातत्याने वाढत आहेत. तसेच भारतात महिलांना होणाऱ्या कॅन्सर च्या 14 टक्के प्रमाण स्तन (ब्रेस्ट कॅन्सर) चे आहे   असे सांगून महिलांमध्ये प्रामुख्याने होणाऱ्या   Vulva Cancer, Cervical Cancer विषयीही त्यांनी सविस्तर माहिती दिली. महिलांनी स्तना मध्ये  किंवा छातीत गाठ अथवा सूज आढळून आल्यास कुठलाही संकोच न करतान करता तज्ञ  डॉक्टरांकडे जाऊन वेळीच  निदान व उपचार करून घेतल्यास  हा घातक रोगनिश्चित बरा होतो असे प्रतिपादन केले . तसेच चाळीस वर्षे वयावरील महिलांनी एकदा तरी आपली मॅमोग्राफी करून घ्यावी असे आवाहन केले.


    शिरपूर दाऊदी बोहरा समाजा चे   प्रमुख जनाब शेख शब्बीर मुमीन यांनी यावेळी शिरपूर  शहरातील बोहरा समाजाने 100% लसीकरण करण्याचे उद्दिष्ट प्राप्त केल्याचे अभिमानाने नमूद केले व समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू डॉक्टर   सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन साहेबांनी 60 वर्षावरील महिला व पुरुषांसाठी सकाळ-संध्याकाळ पायी चालण सक्तीचे  केले असल्याचे सांगितले आणि सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.


  याप्रसंगी आमदार काशीराम दादा पावरा, जनाब साहेब शेख शब्बीर  मुमिन, बेनिसाब तस्नीम बेन मुमीन, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर प्रियंका पाटील,सचिन माळी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी बेनिसाहेब तस्नीम बेन,  दिलीप माळी, डॉक्टर तस्नीम मुस्तफा जलगाव वाला, उम्मेहनी बोहरी, तस्नीम, खानभाई, जोहरतुलमच्छ, फरिदा धोरजीवाला, फातेमा कुक्षीवाला, बिकिसबेन दाऊदी व समाजातील सर्व महिला पुरुष   व युवकांचे सहकार्य लाभले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने