शहादा (प्रतिनिधी) :- शहादा पंचायत समिती सर्वसाधारण सभा १२ नोव्हेंबर (शुक्रवारी) रोजी पार पडली त्यात मंदाणे (ता.शहादा) गणातील पंचायत समिती सदस्या रोहिणी दिनेश पवार यांनी सर्वसाधारण सभेत मंदाणे गणातील अनेक विषय घेतले त्यात महत्वाचा विषय असा की सध्या डेंगूची साथ चालू असून मंदाणे गावातसह परिसरात डेंगूची साथ जोरात वाढू लागली आहे. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने काळजी घेत लवकरात लवकर प्रत्येक गावात फवारणी करावी असे सभेत विषय घेतला सर्व सदस्यांनी ह्या विषयास एकमतीने सहमत दाखवला व गटविकास अधिकाऱ्यांना तसे शक्तीचे निवेदन देण्यात आले. पंचायत समिती सदस्य गोपी पावरा यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र दूधखेडा येथे कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने दुधखेडासह परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत. आरोग्य केंद्रात कर्मचारी नसल्याने रुग्णांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आरोग्य केंद्रास लवकरात लवकर कर्मचारी दयावे असे निवेदनामार्फत पावरा यांनी सांगितले.
Tags
news
