मालपुर येथे दि.१३/११/२०२१रोजी महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात ठिक १०वाजता "आमचा गाव आमचा विकास कृती आराखडा बेठक झाली.
अध्यक्षस्थानी शिंदखेडा विस्तार आधिकारी श्री.सावकारे.होते तर सरपंच मच्छिंद्र शिंदे प्रमुख पाहुणे होते.ऊपसरपंच श्री संतोष काशिराम कोळी, ग्रामविकास आधिकारी श्री.एल.सी.पाटील,ग्रामपंचायत सदस्य श्री.अरुण धनगर,धनराज इंदवे.,भटु गोविंदसिंग रावल,माजी ऊपसरपंच श्री.जगदिश सखाराम खंडेराय जि.प.केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री.रघुनाथ महादु कोळी,श्री.राजेंद्र चौधरी,श्री.सुधीर पानपाटील,उपशिक्षक चंचल नागरे सर, बोरसे, अनिता पाटील व सर्व अंगणवाडी चे शिक्षिका ऊपस्थित होत्या.
विस्तार आधिकारी सावकारे म्हणाले कि. गावातील सर्व पदाधिकारी यांना आमञित करुन देखील कृती आराखडा बैठकाला आले नाही फारच कमी ऊपस्थिती पाहुन मला ख.त वाटते. आज आपल्याला १५वित्त आयोगातुन विविध विकास कामाचे मंजुरी बाबत चर्चा करणार आहोत.
ग्रामविकास आधिकारी एल.सी.पाटील म्हणाले कि मालपुर गावासाठी सन २०२१ २२वर्षासाठी वार्ड क्रमांक २,३,५,६,मध्येमहिलांसाठी सार्वजनिक शौचालय मंजुर आहेततसेच काही वार्डमध्ये भुमिगत गटारी मंजुर आहेत. अंगणवाडीसाठी गॅसपुरवठामंजुर आहे. तरी वरील कामे लवकरच करण्यात येतील.ग्रामपंचायत संघणकलिपिक श्री.राजेंद्र पानपाटील यांनी सुञसंचालन केले.
Tags
news
