गावठी कट्टा व राउंड सह दोन आरोपी पोलीसांच्या ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा धुळे व शिरपूर तालुका पोलिसांची संयुक्त कारवाई


शिरपूर -  धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शिरपूर तालुक्यातील हाडाखेड गावाजवळ स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलिस स्टेशनच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत गावठी कट्टा व राउंड सह दोन आरोपींना मुद्देमालासह पकडण्यात पोलिसांना यश आले आहे पंकज विनायक खैरमोडे वय 36 वर्षे रा. पोलीस मुख्यालय, धुळे नेमणुक -स्थानिक गुन्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई दिनांक 14 नोव्हेंबर रोजी करण्यात आली.


याबाबत सविस्तर वृत्त असे की गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली होती की, सेंधवा येथील 02 व्यक्ती गावटी कट्टा व राउंड अवैधरीत्या विक्री करीता हाडाखेड येथील विनायक हॉटेल जवळ मोटारसायकलींनी येणार आहेत.या ठिकाणी   पंचासह कारवाई करण्यासाठी पोसई/बाळासाहेब सुर्यवंशी, पोना /  पकज खैरमोडे, पोना/कुनाल पानपाटील पोना /  उमेश पवार यांनी खाजगी वाहणाने हाडाखेड येथील विनायक हॉटेल समोर  समोर साध्या गणवेशात उभे राहुन संशयीत व्यक्तींकडे लक्ष देत असताना एक काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल सवार व्यक्ती तेथे येवुन थांबला व कोणाशीतरी फोनवर बोलतांना दिसल्याने त्याचा संशय आल्याने काहीवेळ  तेथेच थांबलो असता तेथे पांढरा व नारंगी रंगाचा पट्टा असलेली विना क्रमांकाची केटीएम दिक्र मोटारसायकल सवार व्यक्ती त्याचेजवळ येवुन बोलु लागल्याने व गोपनिय माहीतीशी मिळतीजुळती व्यक्ती असल्याने त्याचा संशय आल्याने पोलीसांनी त्यांस 12/45 वा. घेराव घालून आपली ओळख सांगीतली. दोघा मोटारसायकल सवार व्यक्तींना त्यांचे नाव-गाव विचारले असता पल्सर मोटारसायकल सवार व्यक्तीने त्याचे नाव लवकुश नथ्थीसिंग डगोर वय-28 वर्षे रा. शिवकॉलनी निवाली रोड, तह- सेंधवा जि. बडवाणी  असे सांगीतले व त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात खालील वर्णनाचे शस्त्र व मुद्देमाल मिळुन आला.



01) 1600/- रु. कि.चे 04 पिवळसर रंगाचे धातुचे काडतुस ज्याची प्रत्येकी लांबी 2.5 सेंमी व व्यास 7.2 मि.मि. पो.स्टे. जि. प्रत्येकी की 400/-रु.कि.चे

02) 50,000/- कि.ची लाल-काळ्या रंगाची विना क्रमांकाची पल्सर मोटारसायकल चेसिस

03) 5,000/- रु.कि.चा विवो कंपनिचा मोबाईल 

04) 500/- रु.कि.चा सॅमसंग कंपनिचा मोबाईल
 

05) 00/- रु. कि. चे प्लॅस्टीकचे ओळखपत्र त्यावर मध्यप्रदेश पुलीस नाम-लवकुश इगोर पद-नव आरक्षक वैच नं. 689 व क्र. 287 असे लिहीलेले.

वरील वर्णनाचा मुद्देमाल लवकुश नथ्थीसिंग इगोर याचे ताब्यात मिळुन आला व के टी एम मो.सा. सवार व्यक्तीस त्याचे नाव-गाव विचारले असता त्याने त्याचे नाव-आकाश सुरजमल राठोड वय-22 वर्षे धंदा -शिक्षण रा.ग्राम बनिहार तह. सेंधवा जि. बडवाणी  असे सांगितले व त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात खालील वर्णनाचे शस्त्र व मुद्देमाल मिळुन आला.

01)20,000/- रु.कि.चे लोखंडी धातुचा गावठी कट्टा (पिस्टल) त्याची लांबी 17 सें.मी व रुंदी 11.5 सें.मी व नळीचे बॅरल 09 मि.मि असलेली, सेप्टी कॅप, ट्रिगर असलेली पिस्टल ग्रिपवर निळ्या रंगाचे प्लॅस्टीकचे आवरण असलेला गावठी कट्टा (पिस्टल) त्यास लोखंडी धातुची 10.2 से.मि लांबीची मॅगझिन 

 02)20,000/- रु.कि.चे लोखंडी धातुचा गावठी कट्टा (पिस्टल) त्याची लांबी 17 से.मी व रुंदी 11.5 से.मी व नळीचे बॅरल 09 मि.मि असलेली, सेप्टी कॅप, ट्रिगर असलेली पिस्टल ग्रिपवर चॉकलेटी रंगाचे प्लॅस्टीकचे आवरण असलेला गावठी कट्टटा (पिस्टल) त्यास लोखंडी धातुची 10.2 से.मि लांबीची मॅगझिन 

 (03)60,000/- रु.कि.ची पांढरा व नारंगी रंगाची के टी एम मोटारसायकल चेसिस

04)5,000/- रु.कि.चा विवो कंपनिचा मोबाईल
असा एकुण 1,62,000/- रु. मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

वरील वर्णनाचा मुद्देमाल लवकुश डगोर व आकाश राठोड याचे ताब्यात मिळुन आल्याने सदर इसमांना आम्हा पंचासमक्ष पोलीसांनी तुमचा पिस्टल व काडतुस बाळगण्याचा परवाना आहे अगर कसे याबाबत विचारपुस केली असता त्यांनी त्यांचेकडे असा कोणताही परवाना नसल्याचे सांगितल्यावर मुद्देमालासह पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला

 लवकुश नथ्थीसिंग डगोर वय-28 वर्षे रा. शिवकॉलनी निवाली रोड, तह- सेंधवा जि. बडवाणी याचे ताब्यात 04 जिवंत काडतुस व आकाश सुरजमल राठोड वय-22 वर्षे धंदा -शिक्षण रा. ग्राम बनिहार तह. संधवा जि.बडवाणी यांचेकडे 02 गावठी कट्टा मॅगजिनसह चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने मिळुन आल्याने त्याचे विरुद्ध आर्म अक्ट कलम 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक माननीय अप्पर पोलीस अधीक्षक धुळे उपविभागीय पोलिस अधिकारी शिरपूर आर्थिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा व शिरपूर तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने