धुळे - प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केले असून महाराष्ट्र शासनाच्या शासकीय विभागात भाईगिरी होत असून खाजगी टोळ्या निर्माण करून वसुली सुरू असल्याचा आरोप करत सदरच्या गंभीर विषयावर दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अखिल भारतीय प्रवक्ते व राज्याचे मंत्री नबाब मलीक यांनी समीर वानखेडे यांच्याविरूध्द उघडलेल्या आघाडीमुळे एक नवीन गोष्ट समोर आली की, भ्रष्ट अधिका-यांनी विभागात स्वतःची खाजगी टोळी तयार करण्याची नवीनच पध्दत पडली आहे. समाजातील इज्जतदार नवश्रीमंत लोकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये हाके घालून अडकवून त्यांच्याकडून खंडणी वसूलीकामी यांचा वापर केला जातो. खासगी टोळीत भरती केलेल्यांना रेती, वाळू, गौण खनिज, सट्टा, मटका, दारू, अमली पदार्थ तत्सम गंभीर गुन्ह्यांमध्ये हे झीरो पोलीस कार्यरत आहेत. साहेबांसाठी गि-हाईक शोधून वसुली करून देण्याचे काम हे लोक करीत असतात. पूर्वी 'भाई' लोकांच्या टोळ्या अशी कामे करीत. आता साहेबच स्वत: अशा टोळ्या तयार करतात. महाराष्ट्रात गृह व महसूल विभागात अशा टोळ्या कार्यरत आहेत. धुळे जिल्ह्यात तर बहुतेक अधिकाऱ्यांनी अशा टोळ्या पोसल्या आहेत. त्या टोळ्यांच्या मदतीनेच साहेबांकडून काम करून घ्यायचे असेल तर, असे झीरो पोलीस कामाला येतात. प्रत्यक्ष पोलीसांशिवाय यांचाच जास्त राबता असतो. यांचा वसुली कार्यक्रम सुरू असतो. •दुर्देवाने अशा कामाला राजकीय पक्षाचे नेतेही अभय देत असतात.
यामुळे समाजाच्या तळागाळातील वर्गाला व गरीबांना न्याय मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय उध्दव ठाकरे साहेब व महाविकास आघाडीचे शिल्पकार माननीय शरद पवार साहेबांनी या प्रकरणी व्यक्तीशः लक्ष घालण्याची नितांत आवश्यकता आहे.
प्रत्यक्ष घडलेली एकट्या धुळे जिल्ह्यात अशी किमान डझनभर उदाहरणे मी देवू शकतो. अशा दलालांचा सुळसुळाट पोलीस व महसूल कार्यालयात तसेच आर.टी.ओ. वगैरे विभागात दिवसागणीक वाढत चालला आहे. अधिकाऱ्यांनी आपली स्वतःची वसूली गँग तयार करणे हे आता अप्रूप राहीले नाही. समीर वानखेडे प्रकरण हे तर, हिमनगाचे एक टोक आहे. पण यातील सर्वात मोठे लुटारू गृह विभागात आहेत. महाराष्ट्र विकास आघाडीचे शिल्पकार माननीय शरदश्चंद्र साहेब तसेच राज्याचे मुख्यमंत्री माननीय उध्दव ठाकरे साहेब यांना विनंती आहे की, आपण माझ्या वीषयाची गांभीर्याने दखल घ्यावी. अन्यथा “म्हातारी मेल्याचे दुःख नाही मात्र काळ सोकावलेला वाईट” अशी अवस्था होईल. असे पत्रक आज राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व धुळे, नंदूरबार जिल्ह्याचे प्रभारी माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.




