केशरानंद नगर दोडाईचा येथे आमदार मेटेच्या हस्ते महाआरोग्य शिबीर उदघाटन महाआरोग्य शिबीराला भव्य प्रतिसाद... अरुणभाई यांच्या तर्फे ज्ञानेश्वर भामरे यांना मानपत्र प्रदान दोंडाईचा- (अख्तर शाह)




केशरानंद नगर दोडाईचा येथे आमदार मेटेच्या हस्ते महाआरोग्य शिबीर उदघाटन

महाआरोग्य शिबीराला भव्य प्रतिसाद...

अरुणभाई यांच्या तर्फे ज्ञानेश्वर भामरे यांना मानपत्र प्रदान

दोंडाईचा- (अख्तर शाह)

कोरोना काळात पहिल्या लाटेत २५ कोर असतानाही जनतेच्या आशीर्वादाने पुनर्जन्म मिळालेले व कधीही Iसार्वजनिक वाढदिवस साजरा न करणारे जिल्हा परिषद सदस्य आबासाहेब ज्ञानेश्वर भामरे यांनी भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर ठेवून साजरा केला. सदर कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात रुग्ण तपासणीसाठी आले होते. तसेच शुभेच्छा देण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व पक्षीय नेते ,शेतकरी, व्यापारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .त्या प्रसंगी  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांनी ज्ञानेश्वर भामरे यांच्या कार्याचे कौतुक करून आबांचा कामाचा पाढा वाचून दाखिवला तर संदीप बेडसे यांनी आबांनी अचूक टाईम साधून निर्णय घ्यावा राष्ट्रवादी तुमचे स्वागत करेल,तर जहागीरदार यांनी सांगितले की वैद्यकीय सेवा करून आबासाहेब अति उत्तम काम करीत आहेत. अर्जुन जी टिळे यांनी सांगितले की आबांनी वयाची शंभरी गाठावी आणि जनतेची सेवा त्यांच्या हातून घडावी. ज्ञानेश्वर भामरे यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले की माझा पुनर्जन्म झाला असून आता मी 80 टक्के समाजकारण आणि राजकारण त २० टक्के व्यवसाय करणार, पहिले मी शंभर टक्के व्यापारी म्हणून काम करीत होतो आता जनतेच्या आशीर्वादाने  कोरोना आजारावर मात करून माझा पुनरजन्म झाला आहे आता माझे उर्वरित आयुष्य जनतेच्या सेवेसाठी  असेल.  या मतदारसंघामध्ये अनेक खोटे गुन्हे दाखल करणे, दमदाटी करणे, दहशत निर्माण करणे प्रकार सुरू आहे. अशा दृष्ट शिशूपालाचा नाश केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही .१०० गुन्हे  माफ केले असून आता माफी नाही असे जहाल उद्गार त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जाहीर केले.  रामकृष्ण पाटील यांनी सांगितले की मैत्री कशी असावी तर माझी आणि आबांची उदाहरण दिले जायचे. कापसाचा व्यापार सोबत केला आम्ही दोन्ही मृत्यूच्या जबड्यातून वाचलो आहोत आता आबा देखील उर्वरित आयुष्य जनतेच्या सेवेसाठी काम करतील अशा शुभेच्छा दिल्यात तर विनायक मेटे यांनी आबांच्या प्रेमाखातर मी आलो असून आमच्या मैत्रीत पक्ष येणार नाही आबांनी मोठे व्हावे असेही सांगितले. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या करोना महामारीच्या काळात सर्वसामान्यांची अक्षरशः लूट  झाली. करोनाने समाजातील वास्तव समोर आणले. अगदी सख्खी नातीगोतीही किती पोकळ होती याचे भान दाखविले. दुसरीकडे अनेकांनी करोना रुग्णांना आधार देत समाजात अजूनही माणुसकी जिवंत असल्याची जाणीव करून दिली. यातीलच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्ञानेश्‍वर आबा भामरे. स्वतः करोनाबाधित होऊनही त्यातून सावरलेल्या ज्ञानेश्‍वर आबांनी दोंडाईचासारख्या शहरात आज महाआरोग्य शिबिर घेत गोरगरिबांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देत त्यांच्यातील दातृत्व दाखवून दिले. ज्ञानेश्वर आबा भामरे म्हणजे रांगडी गडी असल्याचे शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी महाआरोग्य शिबीर उदघाटन प्रसंगी  उदगार काढले. तसेच महाआरोग्य शिबीराला भव्य प्रतिसाद दिसून आले.

जिल्हा परिषदेचे सदस्य तथा केशरानंद उद्योगसमूहाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर आबा भामरे यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त येथील केशरानंदनगरमध्ये आज सकाळी धुळे येथील रेड स्वस्तिक सोसायटी, छत्रपती शिवाजी ब्रिगेड यांच्यातर्फे मोफत महाआरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया शिबिराचे उदघाटन शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांच्या हस्ते संपन्न झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अर्जुनराव टिळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागिरदार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, रेड स्वस्तिक सोसायटीचे सहमहाव्यवस्थापक रोशन मराठे, चेअरमन सुरेश कोते, सहमहाव्यवस्थापक अशोक शिंदे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राजेश झाल्टे, माजी आमदार रामकृष्ण पाटील, माजी नगराध्यक्ष डॉ. रविंद्र देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे,शिदखेडा विधान सभा क्षेत्र प्रमुख दिपक दादा गिरासे. राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष रहिम दादा मंन्सुरी.
बापू महाजन, अ‍ॅड. एकनाथ भावसार, शिवसेनेचे शानाभाऊ सोनवणे, आकाश कोळी, शैलेश सोनार, दोडाईचा शहर राष्ट्रवादी कार्यअध्यक्ष दयाराम कुवर सर.
आरपीआयचे रामभाऊ माणिक, भुप्रेंद्र धनगर, रमेश बोरसे, राजेश जाधव, रवी जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मयूर पाटील, राहूल माणिक, ईस्माईल पिंजारी आदी मान्यवर प्रमुख पाहुणे होते.
श्री. मेटे पुढे बोलतांना म्हणाले की, सध्याच्या काळात विविध आजारांवर उपचार घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे ठरत आहे. अशा परिस्थितीत ज्ञानेश्‍वरआबांनी सर्वसामान्यांसाठी महाआरोग्य शिबिर घेत मोठा आदर्श निर्माण केला आहे. आबा म्हणजे एक रांगडा गडी. आबांना राजकीय कारकीर्दीत अनेकांनी धोका दिला. मात्र कुणाला धोका देणे आबांच्या रक्तात नाही. त्यांनी ठरवले असते, तर आबा आमदारही बनू शकले असते. सामाजिक क्षेत्रात आबा जसे मोठे झाले, तसेच यापुढेही सर्वसामान्यांसाठी काम करत मोठे व्हा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. यावेळी श्री. टिळे, रोशन मराठे, श्याम सनेर, रामकृष्ण पाटील, संदीप बेडसे, अँड एकनाथ भावसार, अशोक शिंदे, यांनीही मनोगत व्यक्त करत आबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
अभीष्टचिंतन सोहळा समितीचे अध्यक्ष नानाभाऊ मराठे, सल्लागार अँड. एकनाथ भावसार,रामभाऊ माणिक, दिलीप पाटील, महेंद्र पाटील, भूपेंद्र धनगर, संजय मराठे, रामकृष्ण बोरसे, आनंद शर्मा, इस्माईल पिंजारी, रविराज भामरे, शिवराज भामरे, डॉ. महेंद्र बोरसे आदींनी संयोजन केले. शिबिरात हजारो रुग्णांनी विविध आजारांच्या तपासणीचा लाभ घेतला. पात्र रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले.

चौकट.....
अरुणभाईंतर्फे ज्ञानेश्‍वर आबांना मानपत्र
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ज्ञानेश्‍वर भामरे व त्यांच्या पत्नीचा भव्य पुष्पहार घालून सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी, आमदार कुणाल पाटील, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी काही कारणास्तव कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांनी शुभेच्छापर संदेश पाठविले. त्यांचे श्याम सनेर यांनी वाचन केले. तसेच अरुणभाई गुजराथी यांच्यातर्फे ज्ञानेश्‍वर भामरे यांना मानपत्रही प्रदान करण्यात आले.
सुत्रसंचालन महेंद्र सर यानी केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने