सावित्रीबाई फुले नगर, वरवाडे येथे क्षयरुग्ण शोध मोहिम व जनजागृती अभियान



शिरपूर—जिल्हा क्षयरोग केंद्र धुळे,                 क्षयरोग उपचार पथक शिरपूर  कार्यलयामार्फत वरवाडे वार्ड नं. १३ संपुर्ण परिसरातुन क्षयरुग्ण शोध मोहिम व जनजागृती अभियान दि.१5/११/२०२१ ते २५/११/२०२१ पर्यंत राबविण्यात येत आहे, मा जिल्हा आरोग्य अधिकारी धुळे  डॉ नवले साहेब व तालुका आरोग्य अधिकारी शिरपूर  डॉ.राजेंद्र बागुल साहेब  यांच्या मार्गदर्शन नुसार क्षयरोग सर्वे सुरु आहे  डॉ. बत्रा मॅडम   डाँ.धनराज पवार , ललिता लोंखंडे यांच्या सुपरव्हिजन  मध्ये   आशा वर्कर वैशाली बुवा,रुपाली बुवा यांनी सावित्रीबाई फुले नगर वरवाडे परिसर गल्लोगल्ली जाऊन प्रत्येक  घरी क्षयरोग शोध मोहिम राबविली या क्षय रुग्ण शोध मोहिमेत संशयीत चार पेशंट निघाले तपासणी केली असता रिपोर्ट Nil निघाले शिबीरास सर्व महिला,नागरीकांचे सहकार्य विशेष लाभले  यात शि.व.न.पा.नगरसेवक दिपक महादु माळी ,शि.व.न.पा.नगरसेविका सौ.चंद्रकला संतोष माळी यांचे प्रतिनिधी संतोष महारु माळी,वसंत माळी,महादु माळी,लक्ष्मण महाराज,हिरामण माळी,रामलाल माळी यांचे सहकार्य लाभले तसेच सर्व महिला व नागरीकांचे विशेष म्हणजे स्व:ताहुन क्षयरोगा सबंधी माहिती घेऊन  तपासणी करुन घेत आहेत.




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने