पुणे: इंदापूर तालुक्यातील निरगुडे गावात वडीलोपार्जीत ग्रामपंचायत मिळकती मधील जागचे वहीवाटीचे कारणावरून डोक्यात लोखंडी गज व लाकडी दांडक्याने मारहान करुन एका वृध्दाला जखमी करण्यात आले.उपचारा दरम्यान या वृध्दाचा मृत्यू झाला आहे.ही घटना निरगुडे लकडेवस्ती, ता. इंदापुर या ठिकाणी घडली असून मारुती गणपत लकडे, वय ८५ वर्ष अस मृत व्यक्तीचे नांव आहे.या घटनेस बारा तास होतात ना तोच भिगवण पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पुणे ग्रामीण यांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.नारायण ज्ञानदेव लकडे, दत्तु ज्ञानदेव लकडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नांवे आहेत अशी माहिती सहा.पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.
मयताचा नातु श्री.बाळू शिवाजी लकडे वय ३५ वर्ष रा.निरगुडे लकडेवस्ती, ता. इंदापुर याच्या तक्रारीवरुन भिगवण पोलिसांत आरोपी नारायण ज्ञानदेव लकडे, दत्तु ज्ञानदेव लकडे,ज्ञानदेव कृष्णा लकडे, अमर दत्तु लकडे ,तन्मय नारायण लकडे, शुभम नारायण लकडे,पारुबाई ज्ञानदेव लकडे यांविरुध्द इतर कलमांसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,दि. ०४ नोव्हेंबर २०२१ रोजी सायं ५ वाजण्याच्या सुमारास मौजे निरगुडे लकडेवस्ती येथील मारुती मंदीरासमोर निरगुडे गावातील वडीलोपार्जीत ग्रामपंचायत मिळकती मधील जागचे वहीवाटीने कारणावरून नारायण ज्ञानदेव लकडे, दत्तु ज्ञानदेव लकडे,ज्ञानदेव कृष्णा लकडे, अमर दत्तु लकडे ,तन्मय नारायण लकडे, शुभम नारायण लकडे,पारुबाई ज्ञानदेव लकडे, सर्व रा.निरागुडे, लकडेवस्ती जि.पुणे यांनी बेकायदेशीर जमाव जमवुन त्यांचा चुलत भाऊ मारुती गणपत लकडे, वय ८५ वर्ष त्यांचा मुलगा शिवाजी मारूती लकडे, व नातु श्री. बाळू शिवाजी लकडे, वाल्मीक शिवाजी लकडे, सर्व निरगुडे, लकडेवस्ती, ता. इंदापुर, जि. पुणे यांना लोखंडी गजाने,लाकडी दांडक्याने,दगडाने मारहाण करून मारुती गणपत लकडे याचे डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी करून त्यांचा खून केला आहे.शिवाय शिवाजी मारूती लकडे, बाळू शिवाजी लकडे, वाल्मीक शिवाजी लकडे यांना पण मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.
सदर गुन्ह्यातील दोन आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असून सदर गुन्ह्यातील उर्वरीत आरोपी यांचा शोध घेणे कामी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.
Tags
news
