दोंडाईचा- (अख्तर शाह.) येथील नगरपरिषदेचे उप नगराध्यक्ष तथा गरीब नवाज वेलफेअर संस्थेचे अध्यक्ष नबू बशीर पिंजारी यांनी भाऊबीज चे अवचित साधत दीनदुबळ्यांसह कष्टकरी माता.बघनीना घरो घरी जाऊन अकराशे साड्याचे वाटप करत व तीन क्विंटल मिठाई वाटप केले. कोविड काळात परिस्थितीत देखील गरजूंना मदतीचा हात संस्थेच्या माध्यमातून दिला होता. नेहमी समाजाचे काही देणे लागते या उदात्त हेतूने उप नगराध्यक्ष तथा गरीब नवाज वेलफेअर संस्थेचे अध्यक्ष नबू दादा पिंजारी यांच्या माध्यमातून दिवाळीत सगळीकडे धामधूम असताना वंचितांनाही या सणाचा गोडवा चाखता यावा, म्हणून भाऊबीज निमित्ताने गोसीया नगर, गोपालपुरा, तिरमली वाडा, वरवाडे भाग, पाच कंदील आदी भागात अकराशे साड्या व तीन क्विंटल मिठाई वाटप करण्यात आली. याप्रसंगी उपनगराध्यक्ष नबू दादा पिंजारी, अकबर पिंजारी, राजू खाटीक, इस्माईल पिंजारी, सलाम शहा, रफिक शाह. नगरसेवक ईश्वर धनगर.
दानिश पिंजारी,कपिल तिरमले. शिवा नगराळे आदी उपस्थित होते.
Tags
news
