महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक प्रारुप मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द : निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा




धुळे, दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) :  भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 10 डिसेंबर 2021 रोजी मतदान, तर 14 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीसाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील प्रारुप मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.




मतदान केंद्रांची नावे अशी (अनुक्रमे मतदान केंद्राचे ठिकाण, मतदान केंद्रास जोडण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील मतदारांचा तपशील, एकूण मतदार या क्रमाने) : तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय, धुळे ग्रामीण, धुळे, धुळे तालुका क्षेत्रातील धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य, धुळे पंचायत समितीचे सभापती, धुळे महानगरपालिकेचे सदस्य, 93. तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय, साक्री, जि. धुळे, साक्री तालुका क्षेत्रातील धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य, साक्री पंचायत समितीचे सभापती, 18. तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय, शिंदखेडा, जि. धुळे, शिंदखेडा तालुका क्षेत्रातील धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य, शिंदखेडा पंचायत समितीचे सभापती, दोंडाईचा- वरवाडे नगरपरिषदेचे सदस्य, नगरपंचायत, शिंदखेडाचे सदस्य, 59. तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय, शिरपूर, जि. धुळे (नवीन इमारत), शिरपूर तालुका क्षेत्रातील धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य, शिरपूर पंचायत समितीचे सभापती, शिरपूर- वरवाडे नगरपरिषदेचे सदस्य, 47. 
तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय, नंदुरबार, जि. नंदुरबार, नंदुरबार तालुका क्षेत्रातील नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य, नंदुरबार पंचायत समितीचे सभापती, नंदुरबार नगरपालिकेचे सदस्य, 55. तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय, नवापूर, जि. नंदुरबार, नवापूर तालुका क्षेत्रातील नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य, नवापूर पंचायत समितीचे सभापती, नवापूर नगरपरिषदेचे सदस्य, 33. तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय, शहादा, जि. नंदुरबार, शहादा तालुका क्षेत्रातील नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य, शहादा पंचायत समितीचे सभापती, शहादा नगरपरिषदेचे सदस्य, 45. तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय अक्राणी, जि. नंदुरबार, अक्राणी तालुका क्षेत्रातील नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य, अक्राणी पंचायत समितीचे सभापती, 8. तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय, तळोदा, जि. नंदुरबार, तळोदा तालुका क्षेत्रातील नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य, तळोदा पंचायत समितीचे सभापती, तळोदा नगरपरिषदेचे सदस्य, 27. तहसीलदार यांचे दालन, तहसील कार्यालय, अक्कलकुवा, जि. नंदुरबार, अक्कलकुवा तालुका क्षेत्रातील नंदुरबार जिल्हा परिषदेचे सदस्य, अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती, 11. एकूण मतदान केंद्र 10, एकूण मतदारसंख्या 396.   

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने