औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेशासाठी 18 पर्यंत मुदतवाढ




धुळे, दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) : ऑगस्ट 2021 या वर्षात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धुळे येथे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रवेशासाठी 18 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी प्रवेशासाठी यापूर्वी अर्ज केलेला आहे, मात्र ज्यांना प्रवेश मिळालेला नाही. अशा इच्छुक नोंदणीकृत उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धुळे येथे सकाळी 8 ते 11 या कालावधीत  व्यक्तीश: उपस्थित राहून समुपदेशन फेरीकरीता रोज स्वतंत्ररीत्या हजेरी नोंदवावी. संस्थेत समुपदेशन फेरीसाठी हजेरी नोंदविलेल्या उमेदवारांमधून त्याच दिवशी संस्थास्तरावर दुपारी 1 वाजता गुणवत्ता यादी प्रकाशित केली जाईल. त्याच दिनांकास गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांना समुपदेशनाकरीता बोलाविण्यात येईल. प्रवेशाकरीता उपलब्ध जागा, उमेदवाराची मागणी, उमेदवाराची अर्हता या आधारावर प्रवेशाच्या जागांचे वाटप करण्यात येईल, असे प्राचार्य अ. ज. शाह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने