स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुरक्षारक्षक भरती, माजी सैनिकांना आवाहन




धुळे, दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिक प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यात सात हजार 425 सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी असलेल्या अटीत बँकेने सुधारणा केली आहे. आता आठवी उत्तीर्ण परंतु पदवीधर नसावा, असे कळविले आहे.  धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत मूळ डिस्चार्ज बुक, मूळ ओळखपत्र, मूळ एम्प्लॉयमेंट कार्ड व त्यांच्या छायांकित एक प्रतीसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे प्रत्यक्ष भेट देवून नाव नोंदवावे व शिक्षणात दिलेल्या सवलतीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे. सुरक्षारक्षक पदासाठी पात्रता अशी (अनुक्रमे वय, शिक्षण, सैन्य दलातील सेवा, सैन्य दलातील चारित्र्य, मेडिकल कॅट या क्रमाने) : एक ऑक्टोबर 2021 रोजी 45 वर्षांपेक्षा कमी असावे, किमान आठवी उत्तीर्ण परंतु पदवीधर नसावा, किमान 15 वर्षे, हवालदार, चांगले, आय/शेप- 1.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने