शिरपूर —दि.१९/११/२०२१ रोजी हर घर दस्तक कोव्हीड लसीकरण मोहिम वरवाडे येथे संत सावता माळी चौक स्वा.सै.नानासो.शंकर पांडु माळी बहुउद्देशीय हाँल सकाळी ९ ते ३ वा.लसीकरण मोहिम एन.यु.एच.एम.मार्फत तसेच शि.व.न.पा.मुख्याधिकारी नेरकर यांनी सर्व नागरीकांना आव्हाण केले आहे त्यात डाँ.विनल पटेल( मेडीकल आँफिसर काँटेज हाँस्पिटल शिरपूर), डाँ.भुपेश माहेश्वरी( मेडीकल आँफिसर काँटेज हाँस्पिटल शिरपूर),डाँ.समाधान पाटील ( औषध निर्माण अधिकारी), तसेच गल्लोगल्ली जाऊन ज्यांचा पहिला व दुसरा डोस बाकी असेल त्यांना घरोघरी जाऊन कोव्हीड लस घेण्यास उत्साहीत करणार्या आशा वर्कर — रुपाली बुवा,संगिता बारी,ललीता भोई,सपना पावरा या आशा वर्करांनी विशेष मेहनत घेतली व शि.व.न.पा.वसुली विभाग प्रमुख कैलास चौधरी,वसुली कर्मचारी आबा माळी यांचे ही विशेष सहकार्य लाभले या लसीकरण मोहिमेत कोविल्ड शिल्ड लस — ११५ , कोवँक्षिन लस — २७ एकुण लसीकरण १४२ झाले या लसीकरण मेहिमेस गावातील संत सावता माळी समाज मंदिर ट्रस्ट्र अध्यक्ष काशिनाथ डिंगबर माळी,संत सावता माळी समाज मंदिर ट्रस्ट्र सहसचिव संतोष महारु माळी,दिपक महादु माळी,सा.कार्यकर्ता भालेराव माळी,हिरामण माळी,शिवाजी महाराज,महादु माळी,मनोज माळी,हर्षल माळी,विनय माळी,भुषण माळी ,दिलीप बेलदार आदिंनी विशेष सहकार्य केले
Tags
news
