दिव्यांगांच्या विकासासाठी थाळनेर येथे जनजागृती शिबिराचे आयोजन




राज्य व देशातील दिव्यांग बांधवांसाठी शासनाकडून अनेकविध योजना राबविण्यात येतात व त्या योजनांचा खरोखर लाभ संघर्ष करून ही दिव्यांग बांधवांना होत नसल्याने दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी  तालुक्यातील थाळनेर येथील श्री साईबाबा अपंग कल्याण व बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे शनिवारी बैठकीचे  आयोजन करण्यात आले.


          यावेळी तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवांना शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या अनेक योजना विषयी मार्गदर्शन करीत दिव्यांग बांधवांनी स्वतंत्र संघर्ष न करता संघटित होऊन संघर्ष केल्यास योग्य लाभ मिळू शकतो म्हणून दिव्यांग बांधवांसाठी श्री साई बाबा अपंग कल्याण व बहुद्देशीय संस्था एक अधिकृत व्यासपीठ उपलब्ध करून एक पाऊल पुढे टाकत दिव्यांग बांधवांसाठी  महत्त्वपूर्ण काम करीत असून यापुढे दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडण्यासाठी प्रयत्न करेल असे संस्थेचे अध्यक्ष धनगर यांनी सांगितले. या बैठकीत दिव्यांगांच्या सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी दिव्यांग बद्दल सहानुभूती व्यक्त करीत सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन संस्थेतर्फे देण्यात आले दिले या कार्यक्रमाला भूषण मराठे,गणेश बागुल,अमोल टिळे गोपाल ठाकरे कल्पेश मराठे ऋषिकेश नाहीदे,सागर तेले,माजी ग्रामपंचायत सदस्य मंगलाबाई कोळी आदी उपस्थित होते




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने