एकात्मिक आदिवासी विकास विभागातील धुळे आदिवासी विकास प्रकल्पात आजादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.त्यातीलच एक भाग म्हणुन आर.सी.पटेल. अनुदानित प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ,शिरपूर ता.शिरपूर येथे आज दिनांक 22/11/2021 वार सोमवार रोजी आदिवासी क्रांतिकारक जननायक बीरसा मुंडा यांच्या जयंती सप्ताह निमित्ताने आश्रमशाळेत सिकलसेल आजार निदान शिबीर व तंबाखूमुक्त शाळा मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.एच.के.कोळी व व्यासपीठावरील डाॅ.श्री.पंकज चव्हाण डाॅ.श्री.ऋषिराज महाजन डाॅ.श्री.अजय माळी आणि मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य श्री.एच.के.कोळी होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.बी.बी.सोनवणे यांनी केले. श्री.ऋषिराज महाजन यांनी सिकलसेल आजाराविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर इयत्ता ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांची सिकलसेल आजाराची चाचणी घेण्यात आली. व्यसनमुक्ती जन जागृतीपर मार्गदर्शन श्री.बी.बी.सोनवणे श्री.डी.एस.पावरा श्री.आर.एन.पाटील यांनी केले.विद्यार्थ्यांना किशोर वयात लागलेल्या सवयी सहसा सुटत नाहीत तेव्हा योग्य त्या सवयी जोपासून तंबाखु किंवा इतर व्यसनांपासुन लांब राहण्याचे आवाहन आपल्या अध्यक्षिय भाषणातून श्री.एच.के.कोळी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आर.एच.पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.पी.आर.भोई यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री.पी.डी.बच्छाव श्री.डी.बी.पाटील श्री.जे.व्ही.गिरासे ,
श्री.सुशिल भावसार, श्री.व्ही.एन.चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी श्री.एस.आर.खैरनार श्री.बी.एन. पेंढारकर श्री.जी.डी.लांबर्डे, श्रीम.सी.पी.माळी,
श्रीम.टी.ए.ओझरवाला , श्रीम.प्रियंका पावरा , श्रीम.सोनिका हजारे व्यवस्थापक श्री.एस.व्ही.ठाकरे व्यवस्थापक श्रीम.सी.जी.कुवर यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांनी परिश्रम घेतले .
Tags
news
