धक्कादायक भाऊबीजे च्या दिवसी मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावर निर्घुणपणे तरुणाची हत्या उसवाड गावात पसरली शोककळा. नाशिक शांताराम दुनबळे.

 


नाशिक=चांदवड तालुक्यातील उसवाड येथील तरुणाची चाकूने भोसकून चार तरुणांनी हत्या केल्याची घटना आज मनमाड  रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक चार रेल्वेस्थानकावर घडली आहे शिवम संजय पवार वय 21  उसवाड तालुका चांदवडअसे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे प्रेयसीच्या मित्राचे फेक आयडी तयार करून अश्लील फोटो सोशल मीडियावर इंस्टाग्राम अकाउंट वर व्हायरल केल्याच्या रागातून हत्या झाल्याचे बोलले जात आहे भाऊबीजेच्या दिवशी झालेल्या हत्यामुळे संपूर्ण पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात  हळहळ व्यक्त केली जात आहे शिवम ला तीन बहिणी आहे या घटनेनंतर शिवम पवार ची प्रियसी मनीषा संजय साळवे  वय -20 राहणार उल्हासनगर हिने मनमाड लोहमार्ग पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे फिर्यादीत म्हटले आहे की शिवम चे आणि माझे अडीच वर्षापासून प्रेम संबंध आहे त्यामुळे मी माझ्या कामावरील मोहित, भोईर, निश, चेतन मोदडे यांच्यासोबत असल्याने त्यांच्याशी मोबाईल फोनवर बोलणे होत असे शिवम  पवार यांच्या वागण्या वरून शिवम ने मोहित चेतन यांना माझ्याशी बोलण्यास मनाई करून त्यांची इंस्टाग्राम वर फेक आयडी करून अश्लील फोटो टाकल्याचा त्यांना राग आला त्यांनी शिवमला झालेला गैरसमज दूर करायचा असे सांगून मला मनमाड येथे घेऊन आले व तिथे शिवम सोबत झालेल्या भांडणाचा व त्यांनी टाकलेले इंस्टाग्राम वरील टाकलेल्या बदनामीकारक फोटो याचा राग आल्याने  शिवम चा खून केला फॉर्म नंबर -4 वर नंदिग्राम एक्सप्रेस ही गाडी उभी असताना माझ्या समोर मोहित. चेतन. निश. मयूर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण  केली तर मयूर ने चाकूने वार करून त्याचा खून केला असे फिर्यादीत म्हटले आहे याप्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलीस स्थानकात भा द वि 302 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड करीत आहे फरारी आरोपींना पकडण्यासाठी मुंबईकडे पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली घटनास्थळी लोहमार्ग उपविभागीय  अधीक्षक दीपक काजवे यांनी घटनास्थळी भेट दिली

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने