पुणे: इंदापूर नगरपरिषदेच्या नगरोत्थान योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक भवनाच्या कोनशिलेचे अनावरण राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या प्रयत्नाने तसेच इंदापूर नगरपालिका व नागरिकांच्या सहकार्याने या ज्येष्ठ नागरिकांसाठीचे भवन बांधण्यात आले असून आज या भवनाच्या कोनशिलेचे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
हर्षवर्धन पाटील यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की स्वर्गीय भाऊंच्या विचाराचा इंदापूर तालुका असून ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्याची जडण-घडण झाली असून त्यांनी केलेल्या संस्काराने त्यांनी दिलेल्या योगदानाने इंदापूर तालुका सर्व क्षेत्रात पुढे आहे. इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा तसेच नगरपालिकेच्या पुढाकाराने या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी भवन झाले असून इंदापूर तालुक्याचा हा सन्मान आहे. समाज घडवण्याचे कार्य या ज्येष्ठांनी केले असून समाजाची ही दानपेटी आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या उपक्रमासाठी त्यांच्या वैभवासाठी सदैव सहकार्य राहील त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो अशी सदिच्छा यावेळी नगरसेवक भरत शहा यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब घाडगे यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या संघाचे अध्यक्ष प्रकाश सूर्यवंशी,मनोहर चौधरी, आबा पाटील, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, शकील सय्यद, जवाहर बोरा, दत्तात्रय गुजर, खबाले महाराज, जाधव मॅडम, नगरसेवक जगदीश मोहिते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सचिव हनुमंत शिंदे यांनी केले. आभार नंदकुमार गुजर यांनी मानले.
Tags
news
