अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे चांदवड येथील शहरात विकास थंडावला, नागरिकांचा संताप , नाशिक शांताराम दुनबळे.




 नाशिक=चांदवड शहरातील नगरपरिषद हद्दीत मंजूर असलेली विविध विकासकामे सध्या थंडावली असून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री अभिजित कदम हे गेल्या एक महिन्यापासून रजेवर असल्याने काही टेंडर ची कामे प्रलंबित असल्याचे समजते. चांदवड नगरपरिषद मुदत ऑक्टोबर 2020 ला संपल्यावर प्रशासक नियुक्ती झाली यानंतर तरी कामे वेग धरतील अशी भोळसट आशा चांदवड शहरातील नागरिकांना होती मात्र भ्रमनिरास झाला आहे.प्रशासक काळातही जैसे थे परिस्थिती शहरात आहे.शहरातील अपूर्ण अवस्थेतील गटारी,अपूर्ण रस्ते याकडे अधिकारी लक्षच देत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे टेलिफोन एक्सचेंज समोरील नागरिकांनी ड्रेनेज पाण्याच्या गैरसोईबाबत केलेले आंदोलन,वरचे गाव परिसरातील महिला व नागरिकांनी पाणीपुरवठा अभियंता श्री सत्यवान गायकवाड यांना घातलेला घेराव व लेखी आश्वासन देऊन प्रकरणातून सुटका करून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न,शोले पद्धतीने डावखर नगर परिसरातील नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर केलेले आंदोलन हे अधिकाऱ्यांच्या काम करण्यास दिरंगाईचेच परिणाम म्हणावे लागतील.
बस स्टँड शेजारील नाल्यात खूप अस्वच्छता झालेली असून मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे झाली आहेत,यात तीन मोठ्या सापांचे वास्तव्य असून वाचनालय परिसरात अनेकांना सर्प राजाने दर्शन दिल्याने भांबेरी उडाली आहे,काही अघटित घडण्याअगोदार स्वछता विभागाने नाला साफ करणे गरजेचे आहे.या सर्व घटनानंतर अधिकारी वर्गाला जाग येईल का की पहिले पाढे पंचवीस सुरूच राहणार अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने