असंघटित कामगारांसाठी इ श्रम कार्ड अभियान-शिबीर

 



शिरपूर -संकल्पित ध्येयाच्या दिशेने शिवसेना - युवा सेना - शिवशक्ती सेना 
इ श्रम-कार्ड आणि नवीन मतदान साठी अभियान सुरू असून सात दिवस झाले आहेत.
आज शिरपूर वार्ड क्रमांक 6 येथे इ-श्रम कार्ड असंघटित कामगारांसाठी अभियान-शिबीर राबवले. या अभियानांतर्गत वार्डतील असंघटित कामगारांना शासनाची मदत हवी या दृष्टीकोण घेऊन व जनसामान्यांना याचा लाभ व्हावा व त्यांना सुलभता व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. स्थानिक ई सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून लोकांना सोबत घेऊन गावांमध्ये हे कार्य राबवले. यावेळेस उपजिल्हासंघटक विभाभाई जोगराणा, तालुका प्रमुख शिवसेना दिपक भाऊ चोरमले, उपजिल्हा  युवा अधिकारी, धुळे ग्रामीण अनिकेत जी बोरसे, जिल्हाध्यक्ष शिवशक्ती वाहतूक सेना जितेंद्र जी पाटील, उपशहर प्रमुख युवा सेना बबलु भाई,उपतालुका युवा अधिकारी सेना जितेंद्र राठोड, सुनील भाऊ सुर्यवंशी, वाल्मीक भाऊ कोळी,वजीद मलक आदी शिवसैनिक उपस्थित होते.
आयोजक . रेहान सर, मसुद भाई शेख,,जावेद भाई, अजिज भाई,मोसिन पेंटर,सोहिन भाई, तन्वीर शेख,दानिश शेख,अरबाज शेख,समीर शेख,अशिफ, साकिर, कालिया, टीपु इ उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने