शिरपूर - आज दि. 16/11/2021 रोजी आर.सी.पटेल अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा शिरपूर येथे विर बिरसा मुंडा जयंती निमित्त साजरा करण्यात येणार्या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्या कामी माध्यमिक विभागाचे प्राचार्य श्री. एच. के. कोळी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. बी.बी.सोनवणे सर यांच्या नेतृत्वात सहविचार सभा घेण्यात आली.सभेत दिनांक 15/11/2021 रोजी महाशय प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी ,धुळे .यांनी घेतलेल्या मुख्याध्यापक सहविचार सभेत दिलेल्या सर्व सूचना कर्मचार्यांच्या निदर्शनास आणुन दिल्या.तसेच सप्ताहांतर्गत साजरा करण्यात येणार्या कार्यक्रमांची जबाबदारीचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी सर्व शिक्षक-शिक्षिका,अधिक्षक-अधिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Tags
news

