न्यायालयाने परमबीर सिंगांना फरार घोषित केलं



Mumbai +  - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यासंदर्भात न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. मात्र आता न्यायालयाने परमबीर सिंगांना फरार घोषित केलं आहे. परमबीर सिंग यांना फरार घोषित करायचं कि नाही, यावर सुनावणी सुरू होती.

अखेर न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. गुन्हे शाखेतर्फे परमबीर सिंग यांना फरार आरोपी घोषित करण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती.

परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यानंतर त्यांनी वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप केले होते. यामध्ये देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. तर, परमबीर सिंग सध्या गायब आहेत. ते कोर्टातही हजर नव्हते. काही दिवसांपूर्वी त्यांना समन्स बजावण्यात आलं. मात्र काहीही प्रत्युत्तर न आल्याने त्यांच्याविरोधात वॉरन्ट जारी करण्यात आलं आहे.

मुंबई गुन्हे शाखेच्या वतीने मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश भाजीपाले यांच्यासमोर सुनावणी पार पडली. सरकारी पक्षाने युक्तीवाद करताना वारंवार चौकशीचे समन्स बजावण्यात आल्याचं सांगितलं. परमबीरसिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरन्टही जारी करण्यात आलं. मात्र, ते त्यांच्या कोणत्याही पत्त्यावर उपलब्ध नाहीत. आणि कोणत्याही चौकशीसाठी पोलिसांसोबत संपर्कात नाहीत.

त्यामुळे या आरोपीला फरार घोषित करण्याची परवानगी मिळावी आणि खटल्यातील पुढील चौकशीची सुरुवात करावी, अशी मागणी मांडण्यात आली. असं झाल्यास परमबीर सिंग यांच्या अन्य मालमत्तांवर जप्तीची कारवाई होऊ शकते. यासंदर्भातील युक्तीवाद न्यायालयात झाल्यानंतर न्यायाधिशांनी त्यांना फरार घोषित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने