मुकटी येथील गुरुदत्त महाराज व कार्तिकेय स्वामींच्या यात्रोत्सवाला मनाई आदेश




धुळे तालुक्यातील मुकटी येथे प्रतिवर्षाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेला श्री.गुरुदत्त महाराज व कार्तिकेय स्वामींचा यात्रोत्सव संपन्न होतो.या यात्रेत गावातील  रयत.साळुंके, सैंदाणे, व सुर्यवंशी,या समाजबांधव यांच्यावतीने लोकनाट्य तमाशा व तगतराव मिरवणूक काढली जाते,कार्तिकेय पौर्णिमेला परिसरातील एकमेव मंदिर असल्याने भिरडाई,भिरडाणे, सावळी, तांडा,चिंचखेडे,अंचाडे, आमदड,नंदाळे, अजंग,कासविहिर,इ.गावातील भाविक कार्तिकेय स्वामींचा दर्शनासाठी येतात,गेल्या वर्षी हा यात्रोत्सव कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता.तसेच यंदाच्या यात्रोत्सवाला देखील अल्पशा प्रमाणात निर्बंध लादण्यात आले आहेत, यात लोकनाट्य तमाशा,पाळणे व दर्शनासाठी परवानगी देण्यात आली असून,हॉटेल्स,तसेच घरगुती वस्तू,खेळणे,इ.व्यापाऱ्यांना स्टॉल व दुकाने लावण्यास जिल्हा प्रशासनाने सक्त मनाई आदेश जारी केले आहेत,कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षांपासून यंदाच्या यात्रोत्सवात देखील व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार असून,यामुळे सर्वत्र होणाऱ्या यात्रोत्सवात व्यापारी वर्गाने नाराजी दर्शवली आहे,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने