नेवाडेच्या उपसरपंचपदी किशोर पवार बिनविरोध



*शिंदखेडा (प्रतिनिधी)* : तालुक्यातील नेवाडे गाव येथे उपसरपंच पदाची निवड मंगळवार (दि.16) रोजी पार पडली. यात उपसरपंचपदी किशोर बाबुलाल पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच शालिकराम महाले यांचा कार्यकाळ संपत आल्याने ही निवड करण्यात आली.
     नवनियुक्त उपसरपंच किशोर पवार यांचा सत्कार शिवसेनेचे धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते पुष्पहार व शाल देऊन करण्यात आला. याप्रसंगी नेवाडेचे सरपंच लक्ष्मीकांत साळुंके, ग्रामसेवक एन.बी.देवरे, माजी उपसरपंच शालिकराम महाले, ग्रा.पं. सदस्य भुषण साळुंके, ॲड.वसंत पवार, प्रशांत साळुंके, रंगराव पवार, किशोर ढोमण पवार, भाईदास साळुंके, मुनीर पिंजारी, ग्रा.पं. शिपाई ज्ञानेश्वर पवार आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने