महेंद्र सिंह राजपूत
शिरपूर - राजकारणात व समाजकारणात जनसेवक व हृदय सम्राट अशा उपाधी अत्यंत दुर्मिळ असतात आणि ह्या उपाधी मिळाल्या तर त्या फार मोठे राजकीय घराणे व सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांनाच मिळतात. मात्र यास स्व. चंदन सिंग राजपूत उर्फ चंदन आबा हे अपवाद असून एका सामान्य कुटुंबात जन्माला घेऊन असामान्य कर्तृत्व करून जनसेवेच्या माध्यमाने सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान मिळवण्यात ज्यांना यश प्राप्त झाले होते.
आशा चंदन आबांना आज युथ फ्रेंड सर्कल व नेताजी ग्रुप व सर्व समाज समावेशक व राजकीय पदाधिकारी यांनी सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना मान्यवरांकडून जनसेवक व युवा हृदय सम्राट म्हणून संबोधण्यात आले.
दिनांक 2 नोव्हेंबर रोजी शिरपूर तालुका साठी काळा दिवस म्हणून समोर आला आणि शिरपूर शहरातील व तालुक्यातील लाडके नेतृत्व यांनी अल्पशा आजाराने जगाचा अखेरचा निरोप घेतला.
चंदन आबा यांनी अचानक परिवाराची व मित्र परिवाराचे साथ सोडल्याने सर्वांवर फार मोठे संकट ओढवले असून आबांच्या जाण्याने फार मोठी राजकीय व सामाजिक हानी झाली आहे . आबां सारखा दुसरा होणे नाही आणि अत्यंत अल्प आयुष्यात चंदन आबा यांनी स्वकर्तुत्वाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून जनसेवक म्हणून नावलौकिक मिळवला होता. परिवार ,मित्रपरिवार व आपल्या मतदारांशी कायम नाळ जोडून असलेल्या आबांचा प्रत्येकाच्या आयुष्यात सिंहाचा वाटा होता त्यामुळे आबांना जाऊन 12 दिवस झाले असले तरी आबा आपल्यात नाही हे कोणाच्या मनाला पटत नाही, मात्र आबा आपल्या कर्तृत्वाने ,नेतृत्वाने, व कलागुणांनी कायम अजरामर राहतिल. अशा या आपल्या लाडक्या मित्राला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सामूहिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळेस नगरसेवक हेमंत पाटील, नगरसेवक राजू अण्णा गिरासे,नगरसेवक हर्षल राजपूत, नितीन बाबा राजपूत,रत्नदीप सोसोदिया ,डॉक्टर जितेंद्र ठाकूर , मिलिंद पाटील , मोहन पाटील, अशोक पाटील, इत्यादी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली व यानंतर फ्रेंड सर्कल व नेताजी ग्रुप फ्रेंड सर्कल व मित्र परिवारातर्फे सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळेस देखील शेकडोंच्या संख्येने आबांचे अनुयायी उपस्थित होते. यावेळेस चंदन आबांच्या अपूर्ण इच्छा आकांशा पूर्ण करण्याचा निर्धार मित्र परिवाराकडून करण्यात आला.
Tags
news
