वडाळीभोई सव्हिसरोड वरील दगड माती मुळे वाहन चालवताना कसरत, वाहतूकीसाठी रस्ता खुला करा.प्रहार संघटना चे मुख्य अधिकारी यांना निवेदन,. नाशिक शांताराम दुनबळे.




वडाळीभोई सव्हिसरोड वरील दगड माती मुळे वाहन चालवताना कसरत, वाहतूकीसाठी रस्ता खुला करा.प्रहार संघटना चे मुख्य अधिकारी यांना निवेदन,.                                   नाशिक शांताराम दुनबळे.     नाशिक=  शहरासाठी प्रस्तावित असलेल्या चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाइपलाइन साठी केलेल्या खोदकामामुळे वडाळीभोई सव्हिसरोड येथिल उड्डाणपूलाच्या बाजूला असलेल्या सव्हिसरोड वर मोठ्या प्रमाणात दगड माती आली असून यामुळे वाहन धारकांना मोठा ञास सहन करावा लागत आहे.त्यामुळे येथील दगड माती तात्काळ बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी प्रहार संघटना वतीने नगर परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित कदम यांच्या कडे निवेदन दृवारे करण्यात आली आहे.सव्हिसरोड वर दगड माती मुरूम असल्याने वाहन चालवताना कसरत करावी लागत असल्याने छोटे-मोठे अपघात होत आहे रस्त्याचे  बाजूला व्यवसाय करणाऱ्या व्यवसायईक  , खरेदीसाठी गर्दी करत असलेल्या गिर्हाईकाची वाहन उभी करता येत नसल्याने व्यवसाईकाना   नुकसानीची झळ बसत आहे प्रहार संघटना वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले रस्ता खुला करण्यात यावा अन्यथा संघटना तर्फ तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अध्यक्ष सोमनाथ जाधव, गणेश निंबाळकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश गांगुर्डे भरवीर,वडाळीभोई येथिल दतु जाधव, जितेंद्र जाधव, रविन्द्र आहेर, विशाल पवार यांनी दिला आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने