दोंडाईचा आज शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने दुकाने व्यवसायला बंदला १०० टक्के उस्फूर्त प्रतिसाद वसिम रिजवीच्या 'मुहम्मद' या निंदनिय पुस्तकावर बंदी घालण्याची व त्रिपूरा येथे झालेल्या अत्याचारा विरूध्द दोंडाईचा अप्पर तहसीलदार यांना मुस्लिम समाजातर्फॆ निवेदन दोडाईचा - (अख्तर शाह)



दोंडाईचा आज शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने  दुकाने व्यवसायला बंदला  १०० टक्के   उस्फूर्त प्रतिसाद

  वसिम रिजवीच्या 'मुहम्मद' या निंदनिय पुस्तकावर बंदी घालण्याची व त्रिपूरा येथे झालेल्या अत्याचारा विरूध्द दोंडाईचा अप्पर तहसीलदार यांना मुस्लिम समाजातर्फॆ निवेदन 

दोडाईचा   - (अख्तर शाह)
दोंडाईचा शहरात समस्त मुस्लिम समाजा तर्फे मुस्लिम समाजातील नागरिकांनी आप आपले व्यवसाय व दुकाने बंद करून निषेध व्यक्त केला
व माननीय अप्पर तहसीलदार सुदाम महाजन साहेबांना निवदेन देण्यात आले  
 वसीम रीजवी व नरसिमानंद यांनी *इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर (सल्ललाहो अलैह  व सल्लम)* साहेब यांच्या विषयी वारंवार  प्रक्षोभक व सर्व मर्यादा ओलांडल्या व अतिशय खालच्या पातळीवर जाऊन महान शांती दुता विषयी जे विधान केलेले आहे त्या मुळे समस्त मुस्लीम समाजाच्या भावना खुप दुखावल्या गेल्या आहेत.

सैतान वसीम रीजवी याच्यावर पवित्र कुरानाचा अपमान केल्या प्रकरणी संपुर्ण भारतात व महाराष्ट्रात अनेक भागात गुन्हे दाखल केलेले आहेत आता त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केले आहे ज्या मध्ये *इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंवर (सल्ललाहो अलैह व सल्लम) साहेबां*  विषयी आणि पवित्र कुरान या धर्मग्रंथा विषयी अशोभनिय टिपण्णी केलीले आहे तरी सुध्दा सरकार अशा समाजकंटका विरुध्द कोणत्याही प्रकारची कार्रवाई करत नाही. सदर पुस्तकातील निंदनीय मजकुर वाचुन केवल मुस्लिमच नाही तर कोणत्याही सामन्य माणसाचे रक्त उसलेल. अशा प्रकारचे लिखान या पुस्तकात केलेले आहे म्हणून त्याच्यावर
 *प्रेषित मोहम्मद पैगंबर (सल्ललाहो अलैही व सल्लम) साहेब* ची विटंबना केल्या बद्दल अधिक विलंब न करता कायदेशीर कार्रवाई होऊन तात्काल अटक करून समस्त मुस्लीम समाजांच्या भावनांचा आदर करावा. तसेच संविधानाने राज्य सरकारांना कलम CPC 95 नुसार कोणत्याही वाईट हेतूने लिहिलेल्या साहित्यावर बंदी घालण्याचा अधिकार आहे तरी अक्षेपाहार्य असलेल्या कोणत्याही पुस्कांवर प्रकाशनावर बंदी घालण्याचा अधिकार असल्या मुळे रौतान वसीम रिजवीच्या पुस्तकावर या कायदयान्वये तात्काल बंदी घालण्यात यावी.

 त्याचप्रमाणे त्रिपुरा येथील राज्य सरकार राज्यातील धार्मिक मुस्लिम अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात आणि दोपवर कार्रवाई करण्यात अपयशी ठरले आहे. परिणामी द्वेष पसरविणा-या व गुंडानी मुस्लिम समाजातील लोकांना लक्ष्य केलेले आहे. मुस्लिमांच्या घरांची तोडफोड केलेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार काही समाज कंटकांनी राज्याच्या विविध भागात रैली काढल्या. या रैलींमध्ये त्यांनी इस्लाम धर्म आणि *प्रेषित मोहम्मद पैगंबर (सल्ललाहो  अलैह व सल्लम ) साहेबां* विषयी अपमानास्पद घोषणा बाजी केली गेली आणि आता पर्यत १६ हुन अधिक मशिना आगी लावण्यात आलेली आहे व पवित्र कुरानांच्या असंख्य प्रति जाळल्या गेल्या आहेत व शेकडो लोकांवर हल्ले झालेले आहेत.

तरी, या निवेदना द्वारे आम्ही आपणास विनंती करतो की सैतान वसीम रीजवी यास तात्काळ अटक करून त्याच्या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी तसेच त्रिपुरा घटनेतील गुन्हेगारांना ताबडतोब अटक करून त्यांच्यावर कडक कार्रवाई करण्यात यावी व गुन्हेगाराना साथ देणारे अधिका-यांना बडतर्फ करावे ही समस्त मुस्लिम समाजाची मागणी त्वरीत मान्य करून संविधानावर सामान्य माणसाचा असलेला विश्वास अबाधित ठेवावा असे निवदेनात नमुद करण्यात आले आहे ,
 *जमाते रज़ा ए मुस्तफा शाखा दोंडाईचा , जामा मस्जिद ट्रस्ट, फैजाने मदिना मस्जिद ट्रस्ट,  दारूल उलुम कादरिया रज़वीया, आयेशा मस्जिद ट्रस्ट, मुस्लिम सेवा संघ,  अलमदद युवा ट्रस्ट,  डाॅ अल्लामा ईकबाल चॅरिटेबल संस्था, मनियार जमात ट्रस्ट, मुस्लिम सोशल फाऊंडेशन  व ईतर मुस्लिम समाजातील सामाजिक संस्था मार्फत निवदेन देण्यात आले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने