मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर फाट्याजवळ शहर पोलिसांच्या डीबी पथकाने धडक कार्यवाही करीत 1 पिस्तूलासह दुचाकी असा एकूण 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत एका संशयितांला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मुंबई आग्रा महामार्गावरील शिरपूर फाट्याजवळ अमोद्या रस्त्यावर निलकंठेश्वर महादेव मंदिरासमोर बुधवारी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास सापळा रचून काळ्या रंगाची स्पेलेंडर क्र.एम एच 19 ए जी 2123 क्रमाकांच्या दुचाकी थांबवून संशयित हर्षल भिका माळी वय 21 रा.रामसिंग नगर याची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून २० हजार रुपये किंमतीचे १ गावठी बनावटी पिस्टल मॅगझीनसह आढळून आल्याने ताब्यात घेतले.सदर कारवाईत शहर पोलिसांनी पिस्टल मॅगझीनसह व दुचाकी असा 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमालासह संशयितास ताब्यात घेतले.
याप्रकरणी पोकॉ अमित रनमले यांनी फिर्याद दिल्याने शहर पोलीस ठाण्यात हर्षल भिका माळी या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पीएसआय छाया पाटील करीत आहेत
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख,एपीआय गणेश फड ललित पाटील,गोविंद कोळी विनोद आखडमल,अमित रनमळे,मुकेश पावरा,प्रवीण गोसावी,अनिल अहिरे,मनोज दाभाडे,उमेश पवार,आदींनी केली आहे.
Tags
news



