धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी रविवारी दि. 28 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी नंदुरबार येथे जाऊन गावित परिवाराची सदिच्छा भेट घेतली.
आमदार अमरिशभाई पटेल यांचे यावेळी माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हिनाताई गावित, डॉ. सुप्रिया गावित यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शिरपूूूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी व अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे देखील उपस्थित होते.
Tags
news
