शिरपुर जि. धुळे (प्रतिनिधी) : ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर समाजातील प्रत्येक घटकाने व्यसनापासून चार हात लांब रहावे. तंबाकू, गुटखा, दारू या गाेष्टींना अटकाव करण्यासाठी कायदा असला तरी व्यसन राेखण्यासाठी प्रत्येकाची मनाची तयारी महत्वाची आहे. त्यासाठी गावागावात जनजागृती महत्वाची आहे. गावातील सरपंच, पाेलिस पाटील तसेच प्रतिष्ठित नागरीक यांनी व्यसनाचे ताेटे गावकऱ्यांना लक्षात आणून दिल्यास गावे शंभर टक्के व्यसन मुक्त हाेतील. ग्रामीण भागात लहान मुले, युवा पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. तर अनेक परिवारांचे नुकसान झाले आहे. लहान मुले माेठ्यांचे अनुकरण करतात तसेच व्यसनाचे देखील आहे. त्यांना राेखण्यासाठी सामाजिक प्रयत्न महत्वाचे आहेत. जिल्हा पाेलिस अधीक्षक प्रविणकुमार पाटील साहेब यांनी चांगला उपक्रम राबविला आहे. जनतेने स्वागत केले आहे. सर्वांनी स्वता व्यसन मुक्त होऊन आपले गाव, तालुका, जिल्हा विकासाला सहकार्य करावे असे मत थाळनेर पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक उमेश बाेरसे यांनी मार्गदर्शन करतांना मांडले.
पिंप्री ता. शिरपुर येथील सामाजिक सभागृहात काल दि. 27 राेजी सांयकाळी 6 वाजता बैठकीतुन व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करण्यात आली.
जिल्हा पाेलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी धुळे जिल्ह्यात "आपलं गाव.. आपला जिल्हा व्यसनमुक्त" हे अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे.
त्यानुसार गावागावात गुटखा, तंबाकू, गावठी दारू बंदीसाठी जनजागृती वर भर दिला जात आहे. तर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी थाळनेर ता. शिरपुर पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक उमेश बाेरसे यांच्या अध्यक्षतेखाली गावकऱ्याची बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर सरपंच महेंद्र सिसाेदिया, पाेलिस पाटील जयपालसिंह गिरासे, पंचायत समिती सदस्य विजय खैरनार, माजी सरपंच प्रविण राजपूत, संजय धनगर, आर. डी. पाटील, संजय काेळी, भारत राजपूत, आदी उपस्थित होते.
यावेळी सपाेनि बाेरसे यांनी गावाचा कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला तर चर्चेच्या माध्यमातून गावकरी बांधव यांच्या समस्या समजुन घेतल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर पाटील, केशव काेळी, मनाेज राजपूत, महेश धनगर, निंबा पाटील, भिका काेळी, भुरा गिरासे, पंढरीनाथ काेळी, पंडीत पाटील, गाेटू पाटील, लालु धनगर, मधुकर काेळी, नवनाथ पाटील यांनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक पाेलिस पाटील जयपालसिंह गिरासे यांनी तर आभार भारत राजपूत यांनी मानले.
Tags
news



