शिरपूर - आज दिनांक 1-11-2021 रोजी शिरपूर येथे करवंद नाका परिसरात उमेद अभियानातील बचत गटाच्या महिलांनी दिवाळी निमित्त फराळाचे विविध खाद्यपदार्थ व हस्त कलेच्या वस्तूचे स्टोल लावन्यात आले होते. सदर स्टोल ला शिरपूर तालुक्याचे मा सभापती श्री दादासो सत्तरसिंग पावरा यांनी भेट दिली व सदर स्टोल चे फित कापून उद्घाटन केले.
व सर्व स्टोल धारक समूहातील महिलांना उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले. व आपल्या तालुक्यातील या उपक्रमाचे कौतुक देखील केले सदर महिलांना मार्गदर्शन करताना दादा नी बोराडी या ठिकाणी सुद्धा आपण बाजाराच्या दिवशी स्टोल लावा त्यासाठी मी आपणास जागा उपलब्ध करून देतो असें अश्वाशीत केले व सर्व महिलांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या
सदर स्टोल मध्ये महिलांनी विविध प्रकारचे दिवाळी चे फराळ,साड्या, हाताने तयार केलेल्या शोभेच्या वस्तू,आकर्षक फ्रेम ,कटलरी,कॉसमेटिक ,वेफर्स ,पापड,मसाले इ. साहित्य विक्री साठी आणले होते. दिवाळीच्या अनुषंगाने ग्राहकांचा चागला प्रतिसाद लाभल्याने समूहातील महिलांनी समाधान व्यक्त केले
सदर कार्यक्रम मा. मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे , मा. प्रकल्प संचालक धुळे , मा. गटविकास अधिकारी शिरपूर व जिल्हा अभियान कक्ष धुळे यांच्या मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमासाठी तालुका अभियान कक्ष शिरपूर येथील सर्व अधिकारी कर्मचारी व प्रभाग समनव्यक यांनी परिश्रम घेतले.
Tags
news



