सोहम अकादमीचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम संपन्न ! दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा' !




खरंच दिवाळी हा सणच असा आहे की मनामनात चैतन्याची, नाविन्याची आशा पल्लवित होते.
अशाच या दिवाळीच्या निमित्ताने डॉ. मीनलजी भोळे संचलित सोहम कला गुणगौरव अकादमी, मुंबई यांनी आदरणीय शैलजा मुळे मॅडम यांच्या साथीने  सोहम अकादमीचा सुवर्ण महोत्सव साजरा केला.
दहावी-बारावीच्या परीक्षा संपताच घराघरात विद्यार्थ्यांचे करिअर हा ऐरणीचा प्रश्न निर्माण होतो .मग करिअर म्हणजे काय ?इयत्ता दहावी नंतर करियर संधी कोणत्या आहेत? व्यवसाय निवड व करिअर यांचा काय संबंध आहे? संशोधन क्षेत्रातील करियर .या आणि अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून दहावी-बारावीचे करियरविश्व शैलजा मॅडम यांनी सहज संवादाच्या माध्यमातून उलगडले.  
आजचा दिवस खास होता. कारण आज सोहम अकादमीचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम! या कार्यक्रमाला नाबाद शंभर ची उपस्थिती म्हणजे  दुग्धशर्करा योग! ज्येष्ठ-श्रेष्ठ मान्यवर, संचालक,मुख्याध्यापक,विद्यार्थी यांनी खऱ्या अर्थाने सोहम परिवारासह दिवाळी साजरी केली.
सोहम अकादमीचा उद्देशच मुळी *'विद्यार्थी हिताय'* असा आहे. आणि विविध कार्यक्रमांची ,कार्यशाळांची मेजवानी देऊन डॉ.मीनल मॅडम व त्यांच्या टीमने हा उद्देश सफल केला आहे.
या कार्यक्रमाचे  सुरेख सूत्रसंचालन प्रिया उपासनी यांनी केले असून त्यांना समीक्षा तावडे यांची साथ लाभली. गायत्री मेहेत्रे यांचे विशेष योगदान लाभले.
 मा. शैलजा मॅडम ,मा.मिसाळ सर,मा. गोडबोले सर यांनी सोहम अकादमीला  शुभेच्छा दिल्या व या अकादमीचा वारू असाच दौडत
 राहू दे असा आशीर्वाद देखील दिला.मा.कुसाळे सर,मा.वेताळ सर,मा. गाडे सर,मा. डोंगरे सर,मा. इंदलकर मॅडम,मा. कुलकर्णी सर यांचे सोहम अकादमीला योगदान मिळाले. 
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या नाविन्यपूर्ण व अभ्यासपूर्ण प्रश्नांचा  उत्स्फूर्त व सक्रिय प्रतिसाद व मान्यवरांच्या शुभेच्छांनी खऱ्या अर्थाने सोहम च्या मंचावर दिवाळी साजरी झाली व कार्यक्रमाची रंगत वाढली.भविष्यात अशाच अभ्यासपूर्ण  वेबिनार्सचे आयोजन करू असे आश्वासन देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने