बलात्कार प्रकरणातील मनोहर भोसलेची दिवाळी तुरूंगातच प्रतिनिधी दत्ता पारेकर





पुणे:  भोंदूगिरी व बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपी मनोहर  भोसले याचा ३० ऑक्टोबरला बार्शी येथील अतिरिक्त सत्र  न्यायालयाने जामीन फेटाळला आहे. त्यामुळे भोसले यांची दिवाळी तुरूंगातच जाणार. दरम्यान ज्या उंदरगावचे आश्रमाचे जोरावर भोसले पुढे आला होता. त्या आश्रमाला अधीकृत वीज कनेक्शन नव्हते. त्यामुळे भोसले याला अटक करताच वीज वितरण कंपनीने आकडा काढला. त्यामुळे हा आश्रमही अंधारातच आहे.

मनोहर भोसले विरूध्द बारमती पोलीसात भोंदूगीरी व जादूटोणा प्रतिबंधक कायदानुसार ९ सप्टेंबरला  गुन्हा दाखल झाला होता. तर ८ सप्टेंबरला सोलापूर येथे शुन्य क्रमांकाने बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. करमाळा पोलीसांनी ९ सप्टेंबरला  पहाटे ४ वाजता गुन्हा दाखल झाला होता. पुणे एलसीबीने १० सप्टेंबरला लोणंद हद्दीतून अटक केली. बारामती न्यायालयात श्री. भोसले यास

१९ सप्टेंबरला न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यानंतर बारामती न्यायालयाची  परवानगी घेऊन करमाळा पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी भोसले याला ताब्यात घेतले.  १९ सप्टेंबरला अटक केली होती. त्याला पोलीसांनी २० सप्टेंबरला न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. दरम्यान २४ सप्टेंबरला भोसले आजारी  पडल्याने  सोलापूर येथील रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर भोसले  याची सोलापूर येथून दवाखान्यातून २७ सप्टेंबरला सुटका झाल्यानंतर २८ सप्टेंबरला त्याला करमाळा न्यायालयात पोलिसांनी हजर केले. त्यामध्ये त्याला १ ऑक्टोबर पर्यंत  पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर भोसलेला १ऑक्टोबरला  न्यायालयीन कोठडी मिळाली. त्यावर करमाळा पोलीसांनी रिव्हिजन दाखल केले पण न्यायालयाने नाकारले. त्यानंतर भोसले चे वकील रोहित गायकवाड यांनी जामीन अर्ज बार्शी न्यायालयात दाखल केला होता. ऐन दिवाळीच्या तोंडावर न्यायालयाने जामीन नाकारल्याने ४२ दिवस कच्चा कैदी म्हणून तुरुंगातच रहावे लागणार आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने