शिरपूर, बलकुवे ग्रामसेवकाने माहिती न दिल्याने राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक यांनी ठोठावला 5 हजार दंड





 शिरपूर /माधवराव फुलचंद दोरीक मु पो बलकुवे ता शिरपुर जिल्हा धुळे ( माहिती अधिकार कार्यकर्ता)मी बलकुवे ता शिरपुर जिल्हा धुळे येथील ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक 19/10/2018 रोजी माहिती अधिकार अर्ज करुन दिनांक 01/01/2015 ते दिनांक 19/10/2018 पर्यत ची ग्रामसभेत मंजुर ठराव व त्या वरती नागरीकांनी केलेल्या सह्या चे रजिस्टर ची संपूर्ण माहिती  मागीतली होती परंतु तत्कालीन जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक  डी व्ही निकम यांनी तत्कालीन ग्रामसेवक वाय एस देसले यांनी चार्ज देतांना प्रोसेडींग बुक दिले नाही असे कारण दाखवुन कार्यालयात उपलब्ध  अपुर्ण माहिती पुरवली त्यामुळे  अर्जदार यांनी दिनांक 13/12/2019 रोजी प्रथम अपीलीय अधिकारी पंचायत समिती शिरपूर जिल्हा धुळे येथे केले त्यांनी दिनांक 10/01/2019 रोजी सुनावणी घेऊन पुर्ण माहिती पुरवण्याचे आदेश दिले परंतु तरी त्यांनी पुन्हा कोणतीही माहिती पुरवली नाही त्यामुळे  व्यथीत होऊन दिनांक 06/04/2019 रोजी राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक यांचे कडे द्वितीय अपिल केले तरी त्याची सुनावणी दिनांक 17/06/2021 रोजी आंनलाईन गुगल मिट ऐप वरती झाली व आयोगाने एक महिण्यात जनमाहिती अधिकारी यांचे कडुन खुलासा मागीतल्याचा आदेश दिला परंतु तत्कालीन ग्रामसेवक तथा जनमाहिती अधिकारी श्री डी व्ही निकम यांनी आयोगास एक महिन्यात कोणताही खुलासा सादर न केल्याने दिनांक 21 आक्टोंबर 2021 ला त्यांचे विरुध्द माहिती अधिकार कायदा चे कलम 20/1 नुसार 5000,(पाच) रुपये ची दंडाची कार्यवाई चा आदेश देऊन दंडाची रक्कम पंचायत समिती शिरपूर येथील प्रथम अपीलीय अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी त्याच्या पगारातून कपात करुन सदर रक्कमेचा भरणा ००७,इतर सेवा,६० इतर सेवा ८००, इतर जमा रकमा (१८) माहिती चा अधिकार (००७-०१६-१ ) या लेखाशीर्षाखाली जमा करण्याची कार्यवाई करावी व सदर कार्यवाई पुर्ण झाल्यानंतर त्याबाबत आयोगास अवगत करावे असा आदेश दिला आहे.




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने