दोंडाईचा शहरातील दारूल उलुम कादरिया रज़वीया चे विद्यार्थी हाफिज अहेमद रज़ा यानीं एका जागेवर बसून १५ तास तोंडी संपुर्ण कुरान पठण करुन मान पटकवला दोडाईचा (अख्तर शाह)




दारुल उलूम कादरिया रजविया मदरसातील विद्यार्थी हाफिज अहमद रज़ा हाजी फारूख हाजी मुनीर मन्सूरी, वय अकरा वर्षे, या विद्यार्थ्याने दि.१७ नोव्हेंबर पहाटे ५ वाजल्यापासून रात्री १० वाजे पर्यंत  सुमारे पंधरा तास एका जागेवर बसून (तोंडी) संपूर्ण कुरान पाक पठण करण्याचा विक्रम नोंदवला

      हाफिज अहमद रज़ा यांचा  गुलाब गुच्छ देऊन   स्वागत व सत्कार करण्यात आले कार्यक्रम दारुल कादरिया रझवीया मध्ये करण्यात आला , विशेष उपस्थित म्हणून  *खलीफ-ए-हुजूर मुफ्ती अब्दुल हलीम साहब हजरत अल्लामा मौलाना झियाउद्दीन साहेब इमाम नुरानी मस्जिद दोंडाईचा हे होते ।या शुभ प्रसंगी मौलाना मुशाहिद रझा साहब, इमाम गौसिया मस्जिद व मौलाना गुलाम गौस साहब, इमाम गरीब नवाज मस्जिद, मौलाना शाहिद रझा इमाम फैजाने मदिना मस्जिद, मौलाना आसिफ शाह, नंदुरबार चे नगर सेवक हारून भाई हलवाई, दारुल उलूम चे सदस्य व मा शिक्षण सभापती  नाजीम बशीरोद्दीन शेख , हाजी निजामोद्दीन मन्सूरी, हाजी अय्युब मन्सूरी, खाटिक समाजाचे अध्यक्ष ऐजाज हाजी शफी,असलम बागवान,  याकूब हाजी मुनीर, हाजी फारूख हाजी मुनीर, रुबाब शाह टेलर, काझी शफीक , इक्बाल पिंजारी , मुश्ताक पिंजारी , अझहर खान, अलीम शेख, वसीम खाटीक  ,  शफीक काजी ., युनूस खान अभियंता, साबीर भाई, हसन भाई, मेहबूब भाई उपस्थित होतेदारुल उलूमचे सर्व व्यवस्थापक कारी गुलाम गौस रजवी साहब, कारी बिलाल रझा साहब, हाफिज आणि कारी अबुल कलाम हशमती साहब, कारी अकील अत्तारी साहब यांनी या विद्यार्थीचे ज्ञान वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने